Sangli Samachar

The Janshakti News

सांगली जिल्ह्यातील मातंग समाजाचा सर्वांगीण विकास करण्याचं काम येणाऱ्या काळात करू-- कुलदीप भाऊ देवकुळे !


| सांगली समाचार वृत्त |
भंडारा - दि. २८ जुलै २०२४
गेल्या कित्येक वर्षापासून सांगली जिल्ह्यातील अनुसूचित जाती जमाती मधील मातंग समाज हा उपेक्षितच राहिलेला आहे ...मातंग समाजामध्ये खेडोपाडी असणारा समाज बांधव बऱ्याचशा अडीअडचणींना सामोरे जात स्थानिक व्यवस्थेपुढे संघर्ष करत असताना दिसत आहे... देश स्वातंत्र्य होऊन 75 वर्षे उलटून देखील मातंग समाज मात्र आज ही उपेक्षितच राहिलेला आहे सांगली जिल्ह्यामध्ये दहा तालुके आहेत. परंतु या तालुक्यामधील बऱ्याचशा खेडूपाड्यांमध्ये समाजाला अगदी स्मशानभूमी सुद्धा तिथल्या व्यवस्थेला दिली गेलेली नाही ही आजच्या काळात समाजाची अवस्था आहे. 

त्याचबरोबर अशी बरीचशी कुटुंब आहेत जी भूमिहीन आहेत, बेघर आहेत अशा सर्व कुटुंबांना न्याय देण्याचं काम येणाऱ्या काळात साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव समिती सांगली जिल्ह्याच्या वतीने करणार आहोत.. गेल्या काही वर्षापासून मातंग समाजामध्ये वारंवार अन्य अत्याचार सारख्या गंभीर गंभीर घटना घडत आलेले आहेत त्यामध्ये घरावरती हल्ले कुटुंबावरती हल्ले त्यामध्ये दलित कुटुंबातील कितीतरी जणांचा निर्घृण हत्या दलित कुटुंबातील मुलींच्या वरती होणारे अन्याय अत्याचार अशा सर्व घटना वारंवार  प्रसार माध्यमांच्या मधून समोर येत आलेले आहेत मात्र शासन आणि प्रशासन यांचे आरोपींना कुठल्याही प्रकारची भीती नसल्याचे स्पष्ट होत आहे अशा सर्व विषयांवर ती न्याय देण्याच्या भूमिकेने येणाऱ्या काळामध्ये सांगली जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांना लक्षवेधी करणार आहोत मातंग समाजाचा सर्वांगीण विकास कसा करता येईल याकडे पूर्णपणे लक्ष देणार असल्याचे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव समितीचे सांगली जिल्ह्याचे अध्यक्ष सन्माननीय कुलदीप भाऊ देवकुळे सर सावळज येथील बैठकीमध्ये बोलत असताना सांगितले त्यावेळी तालुक्यातील बहुतांश नेतेमंडळी युवक वर्ग उपस्थित होता.