Sangli Samachar

The Janshakti News

पेट्रोल-सीएनजी-इलेक्ट्रिक दुचाकी विसरा, आता येतेय पाण्यावर धावणारी स्कूटर !


| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. २९ जुलै २०२४
पेट्रोल दलातील चढ-उतार, दुचाकींचे कमी ॲव्हरेज या या समस्यावर तोडगा म्हणून बाजारात इलेक्ट्रिक स्कूटर आल्या. ग्राहकांचा त्याला प्रचंड प्रतिसादही लाभला. परंतु त्यातील ॲव्हरेजच्या सीमा रेषा गडद झाल्यामुळे, इलेक्ट्रिक स्कूटरकडे वळणारे पाय मर्यादित राहिले. मग यावर पर्याय म्हणून आली बजाज कंपनीची सीएनजी वर चालणारी 'फ्रीडम' ही मोटर सायकल. परंतु अद्याप ही मोटार सायकल प्रत्यक्ष ग्राहकांच्या ताब्यात न आल्याने आणि त्यातील मर्यादा किंवा अडचणी समोर न आल्याने याबाबत फारसे काही बोलण्याआधीच, दुचाकी प्रेमींसाठी एक नवी दिलासादायक बातमी समोर आली आहे.


'पाण्यावर चालणारी स्कूटर' ही स्वप्नकल्पना प्रत्यक्षात उतरवली आहे ते जॉय ई-बाईक कंपनी 'वार्डविझार्डने' हायड्रोजन फ्युअल सेल आणि इलेक्ट्रोलायझर तंत्रज्ञानावर संशोधन करत कंपनीने पाण्यावर चालणारी स्कूटर बाजारात आणली आहे. हायड्रोजन तंत्रज्ञान भारतात स्वच्छ इंधनासाठी महत्त्वाची भूमिका निभावत आहे त्यामुळे प्रदूषण टाळण्यासाठी ही बाइक खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

ही स्कूटर डिस्टिल्ड वॉटरवर धावते. या वाहनांचं तंत्रज्ञान पाण्यातील मॉलिक्यूल्स वेगळे करुन हायड्रोजन तयार होते. त्याचा वापर स्कूटरमध्ये इंधन म्हणून करण्यात येते. त्या इंधनावर हे स्कूटर धावते. पाण्यावर चालणाऱ्या स्कूटरची गती तशी एकदम जास्त नाही. या स्कूटरची टॉप स्पीड प्रति तास 25 किलोमीटर अशी आहे. या स्कूटरची गती कमी आहे. त्यामुळे स्कूटर चालवण्यासाठी वाहन परवान्याची गरज नाही. विना ड्रायव्हिंग लायसन्स तुम्ही ही स्कूटर चालवू शकता. अनेक ऑटोमोबाईल कंपन्या हायड्रोजनवर चालणारी वाहनं आणण्यावर भर देत आहेत. ही इलेक्ट्रिक स्कूटर एक लिटर डिस्टल वॉटर मध्ये दीडशे किलोमीटरचे अंतर पार करू शकते असा दावा कंपनीमार्फत करण्यात आला आहे. अर्थात कंपनी अजूनही या स्कूटरवर काम करीत असून, याची संपूर्ण चाचणी पूर्ण झाल्यानंतरच ती बाजारात येणार आहे. त्यामुळे नागरिकांना यासाठी थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे.