| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. १४ जुलै २०२४
एकनाथ शिंदे यांनी बंड करून शिवसेनेत उभी फूट पाडली. इतकेच नव्हे तर मुख्यमंत्रीपद आणि शिवसेनेच्या नावासह चिन्हही पटकावले. उद्धव ठाकरे यांनी प्रकरण सुप्रीम कोर्टात नेले. परंतु यावर निर्णय न होता, तारखावर तारखा सुरूच आहेत.
याबाबत आज निर्णय अपेक्षित होता. परंतु आज हे याबाबतची सुनावणी होऊ शकली नाही आता सुप्रीम कोर्टाने 14 ऑगस्ट ही तारीख दिल्यामुळे 'शिवसेना आणि वाघ कुणाचा' याचा निर्णय एक महिना पुढे गेला आहे. तर आमदार उपत्रता प्रकरणावर निर्णय देताना विधानसभा अध्यक्षांनी पक्षपाती केल्याचा आरोप करीत त्यांच्या विरोधात हे सुप्रीम कोर्टात न्याय मागितला आहे. या प्रकरणावर मात्र 23 सुनावणी होणार आहे. यावेळी ही याचिका सर्वोच्च न्यायालयात ठेवायचे की उच्च न्यायालयात पाठवायचे याबाबतचा निर्णय होणार असल्याची चर्चा राजकीय व न्यायालयीन वर्तुळात सुरू आहे.