Sangli Samachar

The Janshakti News

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबाबतचे सोशल मीडियावरील हमीपत्राबाबत खुलाशाची गरज !


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ३ जुलै २०२४
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना' जाहीर केल्यानंतर, या योजनेतील पंधराशे रुपयाचा लाभ मिळवण्यासाठी संपूर्ण राज्यात महिलांचे एकच झुंबर उडाली आहे. परंतु यातील अटींची स्पष्टता नसल्याने कागदपत्र जमा करण्याबाबत महिलांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. त्यानंतर महाराष्ट्र शासनाने यातील काही नियम शिथिल करून दिलासा देण्याचा प्रयत्न केला. आता या कागदपत्रांबरोबरच एक शासनास 'हमीपत्र' भरून देण्याची माहिती सोशल मीडियावरून व्हायरल होत आहे. आता हे महाराष्ट्र हमीपत्र महाराष्ट्र शासनाने भरून देण्याचा निर्णय घेतला आहे की इतर कोणा डोक्यातून हे आम्ही पत्र तयार झाले आहे, याचा खुलासा शासनाकडून होण्याची गरज आहे. अन्यथा पुन्हा एकदा महिलांचे मोठ्या प्रमाणात फसवणूक होऊ शकते अशी चर्चा सर्वत्र सुरू आहे.


लाडकी बहीण योजनेच्या अर्जाचं हमीपत्र वाचा जसं आहे तसं

मी घोषित करते की…
माझ्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न रु.२.५० लाख रुपयांपेक्षा अधिक नाही,
माझ्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता नाही.
मी स्वतः किंवा माझ्या कुटुंबातील सदस्य नियमितर/कायम कर्मचारी/कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग / उपक्रम/ मंडळ/भारत सरकार किया राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा समानिवृतीनंतर निवृत्तीवेतन घेत नाहीत.
मी शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या रु.१,५००/- पेक्षा जास्त रक्कमेचा आर्थिक योजनेचा लाभ घेतलेला नाही.
माझ्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किया माजी खासदार/आमदार नाही.
माझ्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड/कॉपरिशन/बोर्ड/उपक्रमाचे अध्यक्ष/उपाध्यक्ष/संचालक/सदस्य नाहीत.
माझ्या कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे पाच एकरपेक्षा जास्त शेतजमीन नाही.
माझ्याकडे किंवा माझ्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर चारचाकी वाहने (ट्रॅक्टर वगळून) नोंदणीकृत नाहीत.
मी वरीलप्रमाणे घोषित करते की, “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजना संबंधित पोर्टल अॅपवर आधार क्रमांक आधारित प्रमाणीकरण प्रणाली सोबत स्वतःला प्रमाणित करण्यास आणि आधार आधारित प्रमाणीकरणानंतर माझा आधार क्रमांक, बायोमेट्रीक किंवा यतः टाइम पीन (OTP) माहिती प्रदान करण्याची सहमती देण्यात माझी हरकत नसेल. मी हे देखील सहमती देते की, “मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण” योजना माझी ओळख पटवण्यासाठी व प्रमाणित करण्यासाठी माझ्या आधार क्रमांकाचा वापर करु शकतात. मी केवळ शासकीय सेवा व योजनांचे लाभ प्राप्त करण्याच्या उद्देशाने अन्य राज्य किंवा केंद्र शासनाच्या विभागांशी माझे आधार ई-केवायसी (e-KYC) वर्णन पुरवण्यास सहमती देत आहे.

(अर्जदाराची सही)



नोट-

१. उक्त प्रपत्र केवळ ऑनलाईन अर्ज दाखल करण्याच्या हेतूने माहिती एकत्रित करण्याकरीता आहे.
२. अर्ज ऑनलाईन पद्धतीने सफलतापूर्वक प्रविष्ठ झाल्यानंतर खालील पावती प्रदान करण्यात येईल, तसेच SMS/ व्हाट्स अॅप द्वारे सुद्धा पाठविण्यात येईल.
अर्ज दाखल झाल्यानंतर सदर पावती फाडून देण्यात यावी.