| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ३१ जुलै २०२४
सांगली सिव्हिल हॉस्पिटल हे केवळ सांगली जिल्ह्यातीलच नव्हे शेजारच्या कोल्हापूर जिल्ह्यातील तर उत्तर कर्नाटक भागातील जिल्ह्यातील गोरगरिबांसाठी उपचाराकरिता एक महत्त्वाचे केंद्र आहे. या ठिकाणी बाराही महिने 24 तास रुग्ण आणि नातेवाईकांचा कायम राबता असतो. परंतु येथे प्रवेश करण्यासाठी नरकद्वारातून जावे लागते असे म्हटले तर ते फारसे वावगे ठरू नये.
वस्तुस्थिती दर्शविणारा व्हिडिओ
गेल्या आठवड्याभरात संततदार पावसाने संपूर्ण जिल्ह्यात ठिकठिकाणी पावसाच्या पाण्याने मुक्काम ठोकला आहे. सांगली शहरात तर अनेक भागात तळी साठली आहेत. अशातच गोरगरिबांचे आधारस्थान असलेल्या हॉस्पिटलच्या मुख्य इमारतीसमोर चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले असून, येथे येणाऱ्या रुग्णांना व नातेवाईकांना याचा अतोनात त्रास होत आहे. या ठिकाणी अनेक नागरिक पाय घसरून पडले आहेत. परंतु याकडे ना डीनचे लक्ष आहे, ना लोकप्रतिनिधींचे. प्रशासनाने हा चिखल हटवून नागरिकांना उत्तम आरोग्य सेवा निर्माण करून देण्याची गरज आहे. त्यामुळे सांगलीचे खासदार व आमदारांनी या गंभीर परिस्थितीकडे लक्ष देऊन रुग्णांचे होणारी गैरसोय टाळावी, अशी मागणी रुग्णांचे नातेवाईक व नागरिकांतून होत आहे.