| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २१ जुलै २०२४
मिरज येथील नामवंत व प्रथितयश शैक्षणिक संकुल असलेल्या 'गुलाबराव पाटील मेमोरियल ट्रस्ट' या संस्थेचा 32 वा वर्धापन दिन कार्यक्रम उत्साहाने संपन्न झाला. यावेळी पलूस येथील सहकारी क्षेत्रातील नामवंत व्यक्तिमत्व बापू जाधव हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी त्यांनी संस्थेच्या आजपर्यंतच्या यशस्वी वाटचालीचा आढावा घेताना म्हणाले की, मातृ-पितृ ऋणातून मुक्त होणे शक्य नसले तरी ते ऋण मनात ठेवून समाजासाठी काहीतरी विशेष करणे हे अत्यंत महत्त्वा गुलाबराव पाटील मेमोरियल ट्रस्ट या संकुलाच्या संस्थापक चेअरमन पृथ्वीराज पाटील यांनी एक आदर्श भावी पिढी पुढे या निमित्ताने ठेवला आहे.
यावेळी बोलताना बापू जाधव म्हणाले की गुलाबराव मेमोरियल ट्रस्टच्या शैक्षणिक संकुलामुळे मिरज विद्यानगरी म्हणून अधिक उठून दिसून येत आहे. संस्थेचे होमिओपॅथी मेडिकल कॉलेज, नर्सिंग, फिजीओथेरपी या शाखांमधून वैद्यकीय शिक्षण, डीएड व बीएड माध्यमातून शिक्षक प्रशिक्षण, सीबीएसई व स्टेट बोर्डाच्या इंग्रजी माध्यमातील प्री प्रायमरी व प्रायमरी शाळा, आणि कनिष्ठ महाविद्यालयाच्या माध्यमातून दर्जेदार शिक्षणाची गौरवशाली परंपरा निर्माण करण्यात गुलाबराव पाटील यांचे सुपुत्र पृथ्वीराज पाटील यांनी मोठे कौतुकास्पद यश मिळवले आहे, असे गौरवोद्गार बापू जाधव यांनी काढले.
या शैक्षणिक संकुलाच्या माध्यमातून जिल्ह्याच्या शिरपेशात मानाचा तुरा खोवला आहे, असल्याचे सांगून बापू जाधव म्हणाले की, स्व. गुलाबराव पाटील यांनी सहकार चळवळीच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या प्रगतीत अत्यंत भरीव आणि लक्षवेधी कामगिरी केलेली आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष, माजी खासदार आणि सहकार तपस्वी स्व. गुलाबराव पाटील यांच्या लोकसभेच्या कार्याचे प्रेरणा आणि त्यांनी दिलेला निस्वार्थी कार्याचा वारसा यामुळे गुलाबराव पाटील मेमोरियल ट्रस्ट आज वटवृक्ष बनतो आहे.
आपल्या गौरवपर मनोगतात पुढे बोलताना बापू जाधव म्हणाले की, या शैक्षणिक संकुलामुळे हजारो डॉक्टर्स, नर्सेस, शिक्षक, प्राध्यापक, अभियंते, क्लास वन अधिकारी आणि कुशल मनुष्यबळ लाभले आहे. याचे श्रेय पृथ्वीराज बाबा पाटील यांना जाते. बहुजन समाजातील लेकराला सामर्थ्य देणारे ही लक्षवेधी कामगिरी मानावे लागेल.
सुरुवातीस प्रास्ताविकाने प्रमुख पाहुण्यांचे ओळख प्राचार्य डॉ. बी एन कराळे यांनी केले. याप्रसंगी संकुलातील सर्व शाखांचे प्राचार्य, विभाग प्रमुख, समन्वयक, . शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, तसेच विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी केंब्रि स्कूलचे प्राचार्य साहेब लाल शरीर मसले त्याने उपस्थित त्यांचे आभार मानले.