Sangli Samachar

The Janshakti News

बचतगटांनी उत्पादन केलेल्या मालास बाजारपेठ उपलब्ध करून देऊ - शुभम गुप्ता


| सांगली समाचार वृत्त |
मिरज - दि. ९ जुलै २०२४
समता नगर मिरज येथे महिलांकरीता मा. आयुक्त तथा प्रशासक शुभम गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली आर्थिक साक्षरता शिबीर घेण्यात आले. सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका अंतर्गत राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियानाची अंमलबजावणी महानगरपालिका क्षेत्रात करण्यात येत आहे,

सदर योजने अंतर्गत 1730 इतक्या महिला बचत गटाची स्थापना झाली आहे. सदर बचत गटांचे एकुण 63 वस्तीस्तरीय संघ संस्था रजिस्टेशन करण्यात आले आहेत. सदर संघ संस्थेतील बचत गटांना, विदर्भ कोकण ग्रामीण बँकेच्या माध्यमातून 1 कोटी 12 लाख इतके कर्ज देण्यात आले आहे. तसेच सदर संस्थेच्या मार्फत पी. एम. स्वनिधी योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यात आली आहे.

सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिका अंतर्गत स्थापन महिला बचत गटांना केंद्र शासन व राज्य शासन यांच्या सर्व योजनांचा लाभ मिळावा यासाठी मार्गदर्शन करण्यात आले. 

फिजा वास्तीस्तरीय संघ संस्था, मिरज यांच्या कामाबाबत आयुक्त मा. शुभम गुप्ता यांनी कौतुक केले असून, विदर्भ कोकण ग्रामीण बँकेने मोठ्या प्रमाणात कर्ज वितरीत केल्यामुळे बँक अधिकारी यांचे अधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. 

 मा. आयुक्त शुभम गुप्ता यावेळी बोलताना सांगितले म्हणाले की, इतर बँकांनी पुढाकार घेऊन महिला बचत गटांना कर्ज उपलब्ध करुन देण्यात द्यावे. 

कर्ज घेतल्यानंतर महिलांचे उत्पादित केलेल्या वस्तु विक्रीकरीता नक्की बाजारपेठ उपलब्ध करुन देण्यात येईल. यावेळी अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसुळ, उपायुक्त शिल्पा दरेकर, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक विश्वास वेताळ, विर्दभ कोकण ग्रामीण बँक सांगली, मोहसीन शिरगुप्पे, माजी नगरसेवक योगेंद्र थोरात उपस्थित होते. 

सदर कार्यक्रमाचे नियोजन मतीन अमीन, ज्योती सरवदे, किरण पाटील व फरीदा जावेद कुडचीकर अध्यक्ष फिजा वस्तरीस्तरीय संघ संस्था व त्यांचे सर्व पदाधिकारी, शाहीन शेख व एन यू एलएम कक्ष यानी केले.