| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. ३ जुलै २०२४
विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू असून विधानसभा आणि विधान परिषदेत सत्ताधारी आणि विरोधक विविध मुद्द्यावरून आमने सामने येत आहेत. विरोधक सत्ताधाऱ्यांना राज्यातील विविध प्रश्नावरून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. तर सत्ताधारी विरोधकांना ओडीस तोड उत्तर देत आहेत. असे चित्र अधिवेशनात पाहावयास मिळत असताना कधीकधी सत्ताधारी पक्षाचे नेते विरोधकांवर मिश्किल टिपणी करताना पाहावयास मिळत आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत भाषणावेळी मुख्यमंत्री शिंदे विरोधी पक्षाच्या नेत्यांना टोला लगावला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील याना उद्देशून म्हटले की, "जयंतराव तुम्ही तिकडे नकली वाघा बरोबर आहात, पण इकडे असली वाघा बरोबर या असं म्हणत एक प्रकारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जयंत पाटील यांना खुली ऑफर दिली आहे.
काय म्हणाले मुख्यमंत्री ?
शालेय गणवेशाबाबत बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की क्वालिटी बघा आणि मुख्यमंत्री शिंदेनी विधानसभेत नवा आणि जुना शालेय गणवेश दाखवला. ते पुढे म्हणाले की आपल्याला लहान मुलांच्या गणवेशात आणि शालेय पोषण आहारात कोणतीही तडजोड करावयाची नाही. त्याबद्दल कोणी कॉम्प्रमाईज करत असेल तर त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल.
महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्न सोडवण्यासाठी महायुतीच्या सरकारने ठोस पाऊल उचललेले आहे. सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्राची बाजू मांडण्यासाठी वरिष्ठ समुपदेशकाची फौज उभी केली आहे. सीमा वासियांच्या पाठीशी संपूर्ण महाराष्ट्र उभा आहे. आपण एकमताने ठराव करूनही पाठवलेला आहे. 14 डिसेंबर 2022 रोजी गृहमंत्री अमित शहा यांनी एक बैठक घेतली होती. आता पुन्हा एकदा एकत्र बैठकीचे आम्ही आग्रह धरणार आहोत. तसेच महाराष्ट्र कर्नाटक सीमा आंदोलनामधील हुतात्म्यांना दहा हजार रुपये देण्यात येत होते. त्यामध्ये आता वाढ करून 20 हजार रुपये करण्यात आले आहेत, असाही मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितलं.
यावेळी जयंत पाटील यांनी प्रश्न उपस्थित केला की, छत्रपती शिवाजी महाराजांचे वाघ नखे महाराष्ट्रात कधी आणणार आहात ? या संदर्भात बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे महाराष्ट्रात आणण्यासंदर्भात ब्रिटनमधील त्या संग्रहाबरोबर करार केलेला आहे. मंत्री सुधीर मुनगट्टीवार तिकडे जाऊन आलेले आहेत. यामुळे आपल्याला लवकरच वाघ नखे पाहायला मिळतील. पुढे बोलताना शब्द म्हणाले की, जयंतराव तुम्ही तिकडे नकली वाघा बरोबर आहात, इकडे असली वाघा बरोबर या. तुम्ही माझे जवळचे मित्र आहात. असा मिश्किल टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जयंतराव पाटील यांना लगावला.