yuva MAharashtra 'अब दिल्ली दूर नही !' मुंबई ते नवी दिल्ली आता अवघ्या बारा तासात !

'अब दिल्ली दूर नही !' मुंबई ते नवी दिल्ली आता अवघ्या बारा तासात !



| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. १७ जुलै २०२४
'दिल्ली अब दूर नही' किंवा 'दिल्ली अभी बहोत दूर है |' अशा आशियाची वाक्य आपण नेहमीच ऐकतो वा वाचतो. राज्यभरातून राजकारण्यासह, उद्योजक, व्यापारी आणि सर्व सामान्य नागरिकांनाही देशाच्या राजधानीत अर्थात दिल्ली येथे जावे लागते. रस्त्यावरचा प्रवास हा त्यामानाने आतापर्यंत लांबचा व असुविधाजनक होता. मध्यंतरी मोदी सरकारने हे अंतर 24 तासावर आणले होते. आता तर ते बारा तास होईल. यासाठी माथेरान येथून लवकरच ग्रीनफिल्ड एक्सप्रेस वे मार्ग सुरू करण्यात येणार आहे.

माथेरानच्या डोंगराखालून दिल्लीचा बोगदा निघणार आहे. त्यामुळे मुंबईहून 12 तासांत राजधानी दिल्ली गाठता येणार आहे. जगातील सर्वांत लांब म्हणून ओळखल्या जाणा-या आणि दिल्ली ते उरणच्या जेएनपीटी बंदरास जोडणारा असा हा 1350 किमीच्या मार्ग आहे. यासाठी माथेरानच्या इको सेन्सेटिव्ह झोनच्या डोंगररांगातून 4.39 किमीचा आठ पदरी बोगदा लवकरच खोदला जाणार आहे.


पनवेलजवळ माथेरानच्या पायथ्याशी मोरबे गावापासून हा बोगदा सुरू होणार असून, तो ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथनजीकच्या भोज गावापर्यंत असेल. पर्यावरण खात्याची परवानगी मिळाल्यानंतर त्याच्या बांधकामाचं कंत्राट नॅशनल हायवे ॲथॉरिटीने इरकॉन कंपनीला दिलं आहे. या बोगद्यांवर 1 हजार 453 कोटींचा खर्च होणार आहे... यामुळे दिल्ली-मुंबई रस्त्याचं अंतर 24 तासांवरून 12 तासांवर येणार असून, हा ग्रीनफिल्ड एक्स्प्रेस-वे आठ पदरीचा आहे...त्यावर एक लाख कोटी खर्च करण्यात येणार आहे.