| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २० जुलै २०२४
सामाजिक सलोखा हीच खरी देशभक्ती असून, सर्व धर्म समभाव हीच भारतीय संस्कृती आहे. सोशल मीडिया हे जनजागृतीचे माध्यम बनवा. अफवा व बुद्धिभेद करणारे नको. सायबर सेलचे लक्ष आहे. असे मनोगत पोलीस निरीक्षक ओमासे यांनी केले.
विशाळगड घटनेच्या पार्श्वभूमीवर विश्रामबाग शांतता कमिटीची मीटिंग संपन्न झाली. मीटिंगमध्ये विश्रामबाग पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रातील घटनांचा आढावा घेऊन, सदस्यांच्या सूचनांचे पाठपुरावा करण्याचे ठरले. यावेळी 'सदभावना मानवी साखळी' शांतता कमिटीच्या वतीने आयोजित करण्याचे ठरले.
मीटिंगमध्ये शहाजी भोसले, शैलेजा कोळी, प्रीती काळे, नगरसेवक जगन्नाथ ठोकळे, अनारकली कुरणे, डॉ. संजय पाटील, उत्तम आबा कांबळे, अजय उबाळे, मुजीब जांभळीकर, मुनीर मुल्ला, अक्षय आवळे, असलम मगदूम, पापालाल सुतार, अक्षय आवळे उपस्थित होते.