yuva MAharashtra ७६ हजार कोटींच्या नव्या प्रकल्पांमुळे महाराष्ट्र आर्थिक पॉवर हाऊस बनणार; नरेंद्र मोदी

७६ हजार कोटींच्या नव्या प्रकल्पांमुळे महाराष्ट्र आर्थिक पॉवर हाऊस बनणार; नरेंद्र मोदी


| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. १४ जुलै २०२४
राज्याकडे गौरवशाली इतिहास आहे. राज्याकडे सशक्त वर्तमान आहे. आणि राज्याकडे समृद्धी भविष्याचं स्वप्न आहे. विकसित भारताच्या निर्मितीत मोठं योगदान असलेलं राज्य आहे. राज्याकडे इंडस्ट्रीची पॉवर आहे, कृषी पॉवर आहे, राज्याकडे आर्थिक सेक्टरची ताकद आहे. या ताकदनेच मुंबईला देशाचा फायनान्शियल हब केलं आहे. आता महाराष्ट्राला जगातील सर्वात मोठा आर्थिक पॉवर हाऊस बनवण्याचं माझं लक्ष असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल मुंबई येथे बोलताना केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २९ हजार ४०० कोटी रुपयांपेक्षा अधिक किमतीच्या रस्ते, रेल्वे आणि बंदर क्षेत्राशी संबंधित प्रकल्पांचा शुभारंभ केला. ठाणे-बोरिवली दुहेरी बोगदा प्रकल्पाचे आणि गोरेगाव-मुलुंड जोडरस्ता प्रकल्पांतर्गत दुहेरी बोगद्यांचे भूमिपूजन त्यांनी केले. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा शुभारंभही त्यांच्या हस्ते करण्यात आला. लोकमान्य टिळक टर्मिनस येथील नवीन प्लॅटफॉर्मचे आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील विस्तारित प्लॅटफॉर्मचे पंतप्रधान मोदींनी राष्ट्राला समर्पण केले.


महाराष्ट्रातील सर्व बंधू भगिनींना माझा नमस्कार म्हणत मोदींनी मराठीतून भाषणाला सुरूवात केली. मला महाराष्ट्र आणि मुंबईसाठी ३० हजार कोटीचे प्रकल्पाचा शिलान्यास आणि लोकापर्पण करण्याची संधी मिळाली आहे असे सांगून मोदी पुढे म्हणाले की, या प्रकल्पामुळे मुंबई आणि आजूबाजूच्या परिसराची कनेक्टिव्हिटी चांगली होईल. यात रोड आणि रेल्वे शिवाय राज्यातील तरुणांच्या कौशल्यविकासाच्या योजनाही सामील आहेत. यात राज्यात मोठ्या संख्येने रोजगाराची निर्मिती होणार आहे. तुम्ही पेपर पाहिले असतील, दोन तीन आठवड्यापूर्वीच केंद्र सरकारने महाराष्ट्रासाठी वधावन बोर्डलाही स्वीकृती दिली आहे. 76 हजार कोटी रुपये या प्रकल्पाने राज्यात 10 लाखाहून अधिक रोजगार निर्मिती होईल, असं नरेंद्र मोदी यांनी सांगितलं.

गेल्या एक महिन्यापासून मुंबई देश विदेशातील गुंतवणूकदारांच्या उत्सवाची साक्षीदार बनली आहे. छोट्या मोठ्या गुंतवणूकदारांनी आपल्या सरकारच्या तिसऱ्या टर्मचं उत्साहाने स्वागत केलं आहे. एनडीए सरकारच स्थिरता देऊ शकते, स्थायीत्व देऊ शकतं हे लोक जाणून आहे. तिसऱ्या टर्ममध्ये एनडीए सरकार तीनपट वेगाने काम करेल असं मी सांगितलं होतं. आज ते आपण होत असलेलं पाहत असल्याचं मोदी म्हणाले.