| सांगली समाचार वृत्त |
गडचिरोली - दि. १८ जुलै २०२४
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे आपल्या विधानाने नेहमीच चर्चेच्या केंद्रस्थानी असतात. पण गडचिरोली येथे त्यांनी केलेले वक्तव्य सध्या राजकीय वर्तुळात एका वेगळ्या अर्थाने चर्चिले जात आहे. प्रसंग होता तो, नागपूरहून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर गडचिरोली जिल्ह्यातील वडलापेठ येथील सुरजागड इस्पात प्रा. लि. या आयर्न स्पोंज उत्पादन करणाऱ्या कारखान्याच्या भूमिपूजन समारंभासाठी उपस्थित राहण्यासाठी विमान प्रवासाचा.
या विमान प्रवासाचा अनुभव सांगताना अजित दादा म्हणाले की गडचिरोलीकडे येताना हेलिकॉप्टरने उड्डाण केल्यानंतर पोटात गोळा आल्याचा प्रसंग सांगितला. जेव्हा आम्ही विमानाने येत होतो तेव्हा खूप ढग होते, नागपुरातून उड्डाण केले तेव्हा बरे वाटत होते, असे सांगून अजित दादा म्हणाले की गडचिरोली जवळ आलो तेव्हा हेलिकॉप्टर ढगात शिरले आणि माझ्या पोटात गोळा आला. मी इकडे तिकडे पाहत होतो, आम्ही सर्वच जण घाबरलो. मात्र आमच्याबरोबर असलेले देवेंद्र फडणवीस निवांत होते. मी त्यांना आजूबाजूला पहात आपण ढगात जात आहोत असे म्हटले, तेव्हा त्याने वाटले घाबरू नका. आज पर्यंत माझे सहा हून अधिक अपघात झाले आहेत मात्र मला कधीही काहीही झालेलं नाही मी विमानात असो किंवा हेलिकॉप्टरमध्ये काही घडत नाही. आणि झाले ही तसेच. आम्ही सुखरूप जमिनीवर उतरलो. तेव्हा उपस्थितांमध्ये हास्याचा फवारा उडाला.
मात्र सध्या अजितदादांच्या या वक्तव्याचा राजकीय प्रवासासाठी आधार घेतला जात आहे. देवेंद्रभाऊ यांच्याबरोबर जे असतात, त्यांना कोणताही धोका नसतो. असे देवेंद्र फडणवीस यांच्या समर्थक कार्यकर्त्यांकडून विनोदाने बोलले जात आहे.