| सांगली समाचार वृत्त |
नवी दिल्ली - दि. १८ जुलै २०२४
2018 मध्ये सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल झाली. याचिकाकर्त्याने इच्छामरणाला ( पॅसिफिक इथुनेशिया) परवानगी देण्याबाबत विनंती केली होती. आपला अखेरचा श्वास कधी घ्यायचा, हे ठरवण्याचा अधिकार प्रत्येक मरणासन्न व्यक्तीला असल्याचे मत नोंदवित सर्वोच्च न्यायालयाने याला परवानगी दिली होती. यावरून तेव्हा खूप हलकल्लोळ मारला होता.
हे आठवण्याचे कारण म्हणजे सध्या स्विझरलँड मध्ये सारको नावाने एक 'सुसाईड पॉड' मशीन तयार झाले आहे. न्यूयॉर्क पोस्टच्या वृत्तानुसार जे लोक आजारपणाला कंटाळलेले असतात, त्यांच्यासाठी हे मशीन उपयुक्त आहे. वास्तविक व्हेनिस डिझाईन फेस्टिवल मध्ये 2019 मध्येच याचे अनावरण करण्यात आले होते. हा थ्रीडी प्रिंटेड कॅप्सूलचा प्रकार असल्याचे, तेव्हा उत्पादकांनी या स्टॉलला भेट देणाऱ्यांना सांगितले होते. या मशीनचे बटन दाबताच आतील नायट्रोजनची पातळी झपाट्याने वाढते आणि अवघ्या पाच सेकंदात व्यक्ती ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे बेशुद्ध पडते व दहा मिनिटातच त्याचा वेदना रहित मृत्यू होतो अशी या मशीनची खासियत. 'द लास्ट रिसॉर्ट' या इच्छा मरणाच्या बाजूने आवाज उठवणाऱ्या संस्थेने हे मशीन तयार केले आहे.
लास्ट रिसॉर्टचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या वृत्तानुसार, ज्याचे वय 18 वर्षे किंवा त्याहून अधिक असेल आणि ही व्यक्ती गंभीर आजाराने त्रस्त असेल, तर अवघ्या 20 डॉलर्स म्हणजे सुमारे सोळाशे रुपयांमध्ये या मशीनचा वापर करू शकते.
स्विझर्लँडमध्ये इच्छा मरणाला कायदेशीर परवानगी आहे. परंतु स्विच क्रिमिनल कोडच्या कलम 115 नुसार, आत्महत्येस मदत करणे हा स्वार्थीकरणासाठी केलेला गुन्हा असल्याचे नमूद करण्यात आले आहे. याच कायद्याच्या आधारे अनेकांनी या मशीनवर बंदी घालण्याची मागणी केली आहे. कारण त्यांच्यामध्ये हे मशीन नैतिकदृष्ट्या योग्य नाही. कारण हे मशीन वापरताना डॉक्टरांची गरज असत नाही, अशा परिस्थितीत कोणीही जाणून-बुजून कोणाचा तरी खून करण्यासाठी याचा वापर करू शकतो. आता तेथील सरकार काय निर्णय घेते याकडे सर्व जनतेचे लक्ष लागून राहिले आहे.