| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ३० जुलै २०२४
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ.जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली सांगली शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज, युवक शहर जिल्हाध्यक्ष राहुलदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष सांगली शहरजिल्हा बांधकाम कामगार सेलच्यामार्फत महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाअंतर्गत, सांगली मिरज व कुपवाड महापालिकाक्षेत्रामधील नोंदणीकृत ५०० बांधकाम कामगारांना गृहपयोगी साहित्याचे संच वितरण समारंभ संपन्न झाला.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या बांधकाम कामगार सेलच्या माध्यमातून नोंदणीकृत कामगारांना तसेच त्यांच्या पाल्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ सातत्याने गेली ७-८ वर्षापासून देण्यात येत आहे.
या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक कामगार सेल चे जिल्हाध्यक्ष विनायक हेगडे यांनी केले. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते साहित्यांचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे आभार कामगार सेल जिल्हा कार्याध्यक्ष अफजल मुजावर यांनी मानले.
यावेळी महिला शहरजिल्हाध्यक्षा संगिता हारगे, सांगली विधानसभा क्षेत्र अध्यक्ष सचिन जगदाळे, सांगली शहर अध्यक्ष सागर घोडके, नगरसेविका वर्षा निंबाळकर, कामगार सेल जिल्हाध्यक्ष विनायक हेगडे, आयुब बारगिर, तानाजी गडदे, धनंजय पाटील, अनिता पांगम, वंदना चंदनशिवे, शारदा माळी, डॉ शुभम जाधव, महालिंग हेगडे, विजय माळी, संदीप व्हनमाने, आकाराम कोळेकर, फिरोज मुल्ला, स्वाती शिरूर, वैशाली धुमाळ, प्रकाश सूर्यवंशी, अकबर शेख, इर्शाद पखाली, वर्षा लठ्ठे, परवीन फकीर यांच्यासह कामगार सेलचे राहुल हिरोडगी, नितीन माने, अमित चव्हाण, राजू कांबळे, कामगार नेते सुनील कांबळे, प्रकाश कांबळे, अमेय कोलप यांच्या सह मोठ्या संख्येने बांधकाम कामगार उपस्थित होते.