Sangli Samachar

The Janshakti News

तुमच्या पॅन कार्डच्या आधारे दुसरेच कोणी कर्ज घेत नाही ना ? त्यासाठी ही काळजी घ्या !


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २ जुलै २०२४
ऑनलाईनच्या माध्यमातून अनेक प्रकारे फ्रॉड करीत नागरिकांना लुटण्याच्या अनेक घटना आपण मीडिया मधून ऐकत, वृत्तपत्रातून वाचत असतो. पण बऱ्याचदा छोट्या छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष केल्यामुळे आपण या ऑनलाइन फ्रॉडच्या जाळ्यात अडकतो. 

आपलेच पॅन कार्ड वापरून कर्जाच्या माध्यमातून घंटा घालणारा प्रकारही ऑनलाईन फ्रॉड करणाऱ्या गुन्हेगारी करून घडत असतो. आता असा फॉर्ड होऊ नये, आपले आर्थिक नुकसान होऊ नये म्हणून आपणच आपली काळजी घेण्याची आवश्यकता आहे. यासाठी काय काळजी घ्यायची हे मात्र आपल्याला ठाऊक असतेच असं नाही. यासाठी खालील काळजी घेतले तर आपले आर्थिक नुकसान टळू शकते.

पॅन कार्ड ही इन्कम टॅक्स संदर्भातील महत्त्वाच्या कार्यासाठी अत्यावश्यक बाब. इतर शासकीय कार्यातही पॅन कार्ड उपयोगी पडते. परंतु या पॅनकार्ड शिवाय तुम्हाला कोणताही आर्थिक व्यवहार करता येत नाहीत. या द्वारे इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करणे, विमा प्रिमियम जमा करणे, बँक अकाऊंट उघडणे, डेबिट वा क्रेडिट कार्ड तयार करणे, पाच लाखांहून अधिक किंमतीचे व्यवहार करताना हे पॅनकार्ड बंधनकारक आहे. परंतु याचा फायदा उचलून आता सायबर क्राईम करणारे पॅनकार्डचा वापर कर्ज काढण्यासाठी करीत आहेत. पण आता हा दुरुपयोग रोखण्यासाठी काय करायला हवे ?


आपल्या पॅनकार्डचा कोणी गैरवापर तर करीत नाही ना ? याची पडताळणी करण्यासाठी आपला क्रेडिट स्कोर चेक करावा. क्रेडिट स्कोरचा अर्थ कोणत्याही व्यक्तीची लोन चुकविण्याची क्षमता असते. त्यामुळे आपल्या पॅनकार्ड सोबत कोणी लोन तर घेतलेले नाही याचे माहीत कळल्यास मदत होते. जर पॅनकार्डच्या गैर वापराबाबत समजल्यास तक्रार https://www.protean-tinpan.com/ या पोर्टलवर करावी.

तुमच्या पॅनचा गैरवापर होण्याचा धोका असतो ही काळजी घ्या

– तुमच्या संगणकात आणि मोबाईलवर पॅनकार्ड क्रमांक आणि माहीती साठवू नका.

– कोणत्याही अज्ञात पोर्टलवर तुमचे पूर्ण नाव किंवा जन्मतारीख लिहू नका

– कारण सायबर चाचे हा तपशील आयकर वेबसाइटवर तुमचा पॅन कार्ड क्रमांक शोधण्यासाठी वापरू शकतात.

– हॉटेलमध्ये रूम बुक करताना, ई-तिकीट बुक करताना मतदार ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स किंवा आधारकार्ड सारख्या ओळखपत्रांचा वापर करा
– पॅनकार्डला अगदी पर्याय नसेल तरच ओळखपत्र म्हणून वापरा, शक्यतो वापरु नकाच

– पॅनकार्डची झेरॉक्स वा छायाप्रत देताना त्यावर आठवणीने तारीख आणि स्वत:ची सही करा

– मूळ पॅनकार्ड आणि फोटोकॉपी दोन्ही सुरक्षित ठेवा

– सायबर कॅफेमध्ये पॅनकार्ड वापरताना विशेष दक्षता घ्या.