yuva MAharashtra आगामी विधानसभेचे लक्ष्य डोळ्यासमोर ठेवून, विधान परिषदेवर वर्चस्व मिळवण्याचा भाजपची योजना !

आगामी विधानसभेचे लक्ष्य डोळ्यासमोर ठेवून, विधान परिषदेवर वर्चस्व मिळवण्याचा भाजपची योजना !


| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. ८ जुलै २०२४
नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत अपेक्षित यश संपादन न करता आल्यामुळे भाजपने आता जपून पावले टाकण्याचे धोरण अवलंबले आहे. एकीकडे महायुतीतील मित्र पक्षांना चुचकारत असताना आपला हातचा कसा राहील याकडे पक्ष नेतृत्वाचे लक्ष आहे. अशातच आता गुप्त अहवालानुसार राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपला अ'च्छे दिन' येण्याच्या शक्यतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आणि हीच शक्यता लक्षात घेऊन भाजपा लोकप्रिय योजनांसह पुढील टर्ममध्ये आपलाच कसा वर्चस्व राहील याबाबत धोरणे आकत आहे.

याचाच एक भाग म्हणजे आगामी विधानसभेत जर राज्यातील सत्ता गेलेच तर काय करायचे याबाबत भाजपने रणनीती आखली आहे त्यानुसार आता रिक्त असलेल्या विधान परिषदेच्या सभापती पदावर भाजप नेत्याला बसवण्याचा प्लॅन तयार केला जात आहे. यदा कदाचित हातची सत्ता गेली तर वरिष्ठ सभागृहात आपलाच कंट्रोल कायम राहावा हा त्यामागचा दृष्टिकोन आहे. यासाठी भाजपचे माजी मंत्री राम शिंदे, प्रवीण दरेकर किंवा निरंजन डावखरे यांची नावे चर्चेत आहेत.

आता विधानसभा निवडणुकीनंतरच पुढील आदिवासी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजपचा याच अधिवेशनात विधान परिषदेम सभापती निवडणूक घेण्याचा भाजपचा प्रयत्न असून यासाठी मोर्चे बांधणी ही सुरू केली आहे.