| सांगली समाचार वृत्त |
मुंबई दि. ३ जुलै २०२४
सध्या महाराष्ट्र शासनाचे पावसाळी अधिवेशन मुंबईत सुरू आहे. अधिवेशन म्हटले की प्रत्येक आमदार आपल्या मतदारसंघासाठी अधिकाधिक निधी मिळवण्याचा प्रयत्न करीत असतो. पण सत्ताधारी पक्ष त्यावर थातूरमातूर उत्तर देऊन आपले अंग झटकण्याचा प्रयत्न करतो. असाच प्रकार काल महाराष्ट्राच्या पावसाळी अधिवेशनात घडला.
पलूस कडेगाव चे आमदार डॉ. विश्वजीत कदम यांनी सर्पदंशावरील मृत्यूच्या नातेवाईकांना शासनाकडून मदत देण्याची मागणी केली. परंतु वनमंत्री यांनी भाजप अजब प्रकारचे उत्तर दिल्याने, त्यांच्यावर सर्वत्र टीकेचा भडिमार होत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, सांगली कोल्हापूर भागात घोणस नावाचा जो विषारी साप आहे त्याची संख्या कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. हे साप एकावेळी 40 ते 50 पिल्लांना जन्म देतात, पण यावर कोणतीही उपाययोजना वन विभागाकडून करण्यात येत नाही. घोणस चावल्यानंतर माणूस अर्ध्या तासाच्या आत दगावतो. याची कोणतीही लस उपलब्ध नसते, त्यामुळे शासनाने सर्पदंश झालेल्या व्यक्तींना अशी मागणी, आ. डॉ. विश्वजीत कदम यांच्या मागणीवर वनमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाली की, सर्पदोष आणि त्याची मदत वनविभागात येत नाही कारण साप वनात चावत नाहीत तर तुमच्या घरी येऊन चावतात. या उत्तरावर सभागृहात एकच गदारोळ माजला.
नेमकं काय म्हणाले विश्वजीत कदम ?
माझ्या मतदारसंघात सागरेश्वर जुनं अभयारण्य आहे तिथे 2000 हरण आहेत. या भागात हरणांचं नुकसान होत असल्याचे काँग्रेस आमदार विश्वजीत कदम म्हणाले. सांगली जिल्ह्यात बिबट्यांची संख्या देखील वाढत चालली आहे. अनेक हल्ल्याच्या घटना देखील घडल्या आहेत. मात्र, वनखात्यातून उशीरा प्रतिसाद मिळतो असे कदम म्हणाले. तसेच कृष्णा नदीत मगरींची संख्या मोठ्या प्रमामात वाढत चालली आहे. मगरींचे हल्ले होत आहे. याबाबत वनखात्याकडून काहीही उपापयोजना होत नसल्याचे कदम म्हणाले. त्याचबरोबर घोनस नावाचा जो विषारी साप आहे, त्याची संख्या कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वाढली आहे. हे साप डायरेक्ट 40-50 पिलांना जन्म देतात. पण यावर कोणतीही उपाययोजना होत नसल्याचे विश्वजीत कदम म्हणाले. घोनस चावल्यानंतर अर्धा तासात माणूस दगावतो. याची कोणतीही लस उपलब्ध नसते असेही विश्वजीत कदम म्हणाले. मला समजलं की साप हा वनखात्याच्या अंतर्गत येत नाही मग कशात येतो? असा सवाल विश्वजीत कदम यांनी केला.
डॉ. कदमांच्या प्रश्नावर मुनगंटीवारांचे उत्तर
कुंपण हे डीबीटीच्या माध्यमातून दिले जात असल्याचे सुधीर मुनगंटीवार म्हणाले. राज्यात कुंपणासाठी डीबीटी दिली जाते. सर्प दंश आणि त्याची मदत वनविभागात येत नाही असेही मुनगंटीवार म्हणाले. साप वनात चावत नाही तर तुमच्या घरी येऊन चावतो. त्यामुळं साप वनविभागाच्या विभागात येत नाही असं कदम म्हणाले. साप हा पाळीव प्राणी नाही. त्याची मदत विनविभागाकडून दिली जात नाही. संपूर्ण देशात हा नियम असल्याचे मुनगंटीवार म्हणाले.