| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. १३ जुलै २०२४
मा शुभम गुप्ता आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली व उप आयुक्त शिल्पा दरेकर यांच्या उपस्थितीत माझी लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीसाठी डी. एन. एंल. एम. अंतर्गत स्थापन वस्ती स्त्रिय संघ सी एल सी तसेच समूह संसाधन व्यक्ती, बचतगट यांच्या माध्यमातून सर्व महापालिका क्षेत्रात माझी लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणी नियोजन करण्यात आले आहे, साधारणपणे सांगलीसाठी 12 मिरजेसाठी 15 आणि कुपवाड साठी 11 असे एकूण 38 समूह संसाधन व्यक्ती असणार आहेत, त्यांच्या माध्यामातून माझी लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणी नियोजन करण्यात आले आहे,
सांगली मिरज आणि कुपवाड महापालिका क्षेत्रात 20 ठिकाणी ऑनलाइन व्दारे अर्ज भरण्याची सोय उपलब्ध होणार आहे, तसेच प्रभाग समिती निहाय देखील सदरची सोय उपलब्ध करून दिली आहे. जास्तीत जास्त ठिकाणी माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरून घेऊन घेऊन लाभ उपलब्ध करून देण्यासाठी महापालिका प्रशासनाने नियोजन केले आहे. मनपा शाळा अंगणवाडी सेविका यांच्या माध्यमातून देखील अर्ज स्वीकारले जाणार आहे, आपल्या भागांमधील अंगणवाडी मध्ये ही सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे, असे शुभम गुप्ता यांनी म्हटले आहे.