Sangli Samachar

The Janshakti News

भाजपच्या आक्रमक भूमिकेमुळे हरिपूर रोडवरील प्रशासनाने काढलेला भगवा ध्वज केला सन्मानाने परत !


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ३० जुलै २०२४
सांगली हरिपूर मार्गावरील लोखंडी पुलावर 2016 पासून मध्यवर्ती ठिकाणी भगवा ध्वज लावलेला होता. सन 2019 आणि 2021 मध्ये आलेल्या महापुरावेळी बचाव पक्काच्या घोड्यांना दिशा करण्यासाठी या ध्वजाचा मोठा उपयोग झाला होता सहा महिन्यापूर्वी एक नागरिक या ध्वजाला थडकून जखमी झाला होता. त्यामुळे पोलीस प्रशासनाने हा ध्वज नुकताच काढला. यामुळे या भागात मोठा तणाव निर्माण झाला होता. याच दरम्यान भाजपच्या नेत्या ॲड. स्वाती शिंदे तिथे पोहोचल्या आणि त्यांनी आंदोलनकर्त्याना पाठिंबा देत, आक्रमक भूमिका घेतली.


यावेळी नागरिकांनी घोषणा देत रास्ता रोकोही केला त्यामुळे वाहतूक खोळंबली, वातावरण तणावग्रस्त झाले. यादरम्यान पोलीसही तेथे पोहोचले. ॲड. स्वाती शिंदे यांनी पालकमंत्री सुरेश खाडे, जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे, महापालिका आयुक्त शुभम गुप्ता यांच्याशी फोनवरून संपर्क साधून परिस्थितीचे गांभीर्य समजावून सांगितले. परंतु पोलीस प्रशासन हा ध्वज परत देण्यासाठी नकार देत होते. 

अखेर सर्व शिवभक्तांच्या रेट्यामुळे आणि ॲड. स्वाती शिंदे यांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे पोलिसाला हा ध्वज सन्मानाने परत करावा लागला. तेव्हा उपस्थित शिवभक्तांनी दिलेल्या घोषणांनी परिसर दणाणून गेला. यावेळी युवराज बावडेकर, उर्मिला बेलवलकर, अभिमन्यू भोसले, दिगंबर साळुंखे, अवधूत जाधव, प्रदीप निकम, गजानन मोरे यांच्यासह शेकडो शिवभक्त या ठिकाणी उपस्थित होते. ध्वज परत मिळाल्यानंतर तो पूर्ववत तेथे लावण्यात आला तेव्हा वातावरण निवळले.