yuva MAharashtra महाराष्ट्र क्रिकेट संघ व्यवस्थापनात सांगलीकरांची एन्ट्री !

महाराष्ट्र क्रिकेट संघ व्यवस्थापनात सांगलीकरांची एन्ट्री !


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ६ जुलै २०२४
महाराष्ट्र क्रिकेट संघटनेतर्फे 2024-2025 या हंगामासाठी निवड समिती सदस्य, प्रशिक्षक व संघ व्यवस्थापक,फिजिओ,फिटनेस ट्रेनर यांची निवड करण्यात आलेली आहे. यामध्ये सांगली जिल्हा क्रिकेट संघटनेकडून 19 वर्षाखालील संघ व्यवस्थापक म्हणून राहुल आरवाडे, 23 वर्षाखालील संघ व्यवस्थापक प्रितेश कोठारी व 15 वर्षाखालील मुलींचे क्षेत्ररक्षक प्रशिक्षक म्हणून गणेश कुकडे तसेच अनंत तांबवेकर यांची 19 वर्षाखालील मुलींचे क्षेत्ररक्षक व गोलंदाज प्रशिक्षक, सुमित चव्हाण 14 वर्षाखालील मुलांचे निवड समिती सदस्य, योगिता पडियार 23 वर्षाखालील मुलींचे फिटनेस ट्रेनर तसेच राहुल निंभोरे 19 वर्षाखालील मुलांचे व विशाल दीप 14 वर्षाखालील मुलांचे फिजिओ म्हणून निवड तसेच  विजय कदम याची महाराष्ट्र प्रीमियर लीग  या स्पर्धेकरिता  गुणलेखक  म्हणून निवड झाली.


या निवडीकरिता महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे खजिनदार सांगली जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे कार्याध्यक्ष माननीय संजयजी बजाज साहेब यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. या निवडीबद्दल सांगलीच्या क्रिकेट क्षेत्रातून समाधान व्यक्त करण्यात येत असून निवड झालेल्या सदस्यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.