| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २४ जुलै २०२४
खरंच... मैत्री म्हणजे एक वटवृक्ष आणि आपुलकीचा स्नेहबंध ज्याच्या आयुष्यात असतो, तो जगातील सर्वात समृद्ध व्यक्ती असे आपण म्हणू शकतो... आणि अभिमानाने सांगतो, माझ्या आयुष्यातील मैत्रीचा हा वटवृक्ष आणि आपुलकीचा स्नेहगंध नेहमीच बहरलेला असतो... याची प्रचिती नेहमीच येत असते.
आज माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने ती प्रचिती पुन्हा एकदा आली... माझ्या अनेक नातेवाईकांनी, हितचिंतकांनी, स्नेह्यांनी वाढदिवसानिमित्त प्रत्यक्ष भेटून, फोनवरून आणि सोशल मीडियावरून भरभरून शुभेच्छा दिल्या... याबद्दल मी त्या सर्वांना मनापासून धन्यवाद देतो. ज्यांच्यामुळे आज माझा दिवस समृद्ध झाला !...
आपल्या मैत्रीचा वटवृक्ष आणि आपुलकीचा स्नेहबंध असाच बहरत राहो !...
रमेश नेमिनाथ सरडे
संपादक, सांगली समाचार ई दैनिक.