Sangli Samachar

The Janshakti News

प्रेमविरांपासून शास्त्रज्ञांपर्यंत वेड लावणाऱ्या, चंद्राबाबत आश्चर्यकारक नवी माहिती समोर !


| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. ६ जुलै २०२४
ज्योतिष शास्त्रापासून ते अगदी प्रेमविरापर्यंत चंद्राला विशेष मान असतो. कवी आणि आई यांच्या दृष्टीनेही चंद्र तितकाच महत्वाचा. तर खगोलशास्त्राचा अभ्यास करणाऱ्या शास्त्रज्ञांना हा जवळचा विषय. तर व सामान्यांच्या दृष्टीने या चंद्रावरील असलेल्या खळ्याबाबत विशेष आकर्षण... आणि याच चंद्राभोवतीच्या खळ्याबद्दल आता शास्त्रज्ञांनी केलेल्या नव्या दाव्यानुसार हा चंद्र पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे.

चंद्राच्या पृष्ठभागावर दिसणारे आकर्षक खुप अर्थात गूढ स्वरुपाचे वलय वैज्ञानिकांना अनेक वर्षांपासून गोंधळात टाकत होते. हे वलय अनेक किलोमीटरच्या अंतरापर्यंत विस्तारलेले असून दूरवरवरूनही दिसतात. परंतु नुकत्याच झालेल्या संशोधनामुळे या चंद्रावरील आश्चर्यकारक आकृतिबंधामागील रहस्य उलगडण्यास मदत मिळाली आहे.


नासाच्या छायाचित्रांवरून हे वलय केवळ कलात्मक आकृतिबंध नसून चुंबकीय विसंगतीशी संबंधित असल्याचे दिसून आले आहे. या वलयामधील खडकांचे चुंबकीकरण झाले असून ते सूर्यापासून येणाऱ्या किरणांपासून चंद्राचे संरक्षण करतात. त्यामुळे हे वलय उजळ दिसतात, तर जवळील खडक मात्र सूर्यकिरणांमुळे होणाऱ्या रासायनिक प्रतिक्रियांमुळे गडद होतात.

क्रॉब्झिन्स्की यांनी पर्यायी सिद्धांत मांडला आहे ज्यामध्ये जमिनीच्या आतून वाहणारा लावा चुंबकीय क्षेत्रात थंड झाल्यावर हे विसंगती निर्माण होऊ शकतात. त्यांच्या प्रयोगांमध्ये चंद्रावर मोठ्या प्रमाणात आढळणाऱ्या इल्मेनाइट या खनिजावर वेगवेगळ्या वातावरणीय रचनांचा आणि लावा थंड होण्याच्या वेगवेगळ्या गतीचा परिणाम तपासण्यात आला. या संशोधनानुसार चंद्राच्या वातावरणात इल्मेनाइट चुंबकीकरण होऊ शकणारे लोह कण तयार करू शकतो, विशेषत: पृष्ठभागाच्या क्षेत्रफळाच्या मानाने जास्त असलेल्या लहान कणांमध्ये, असे त्यांनी म्हटले आहे.