Sangli Samachar

The Janshakti News

संभाव्य महापुराचा धोका टाळण्यासाठी हिप्परगी व अलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू !


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २१ जुलै २०२४
कोयनेच्या घाटमाथ्यापासून सांगली जिल्ह्यातील कृष्णा वारणा नदीच्या परिसरात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे या दोन्ही नदींची पातळी वाढली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील पंचगंगानेही धोक्याची पातळी गाठली आहे. या पार्श्वभूमीवर वेगाने वाढणाऱ्या कोल्हापूर सांगली सातारा जिल्ह्यातील कृष्णा, वारणा व पंचगंगा नदी काठावरील नागरिकांची धाकधूक वाढली आहे.


अर्थात संभाव्य महापुराचा धोका लक्षात घेऊन कर्नाटकातील हिप्परगी धरणाचे सर्व दरवाजे उघडण्यात आले आहेत तर अलमट्टी धरणातून एक लाख क्युसेसहून अधिक पाणी सोडण्यात येत आहे, त्यामुळे कोल्हापूर सांगली सातारा जिल्ह्यातील नद्यांना महापुराचा कोणताही धोका नसल्याचे, तिन्ही जिल्ह्यातील पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले असून, हे सर्व अधिकारी संभाव्य महापराच्या दृष्टीने सातत्याने नदी पातळी आणि धरणातील पाण्यावर लक्ष ठेवून आहेत. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये, कोणतीही अफवा पसरवू नये असे या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.