| सांगली समाचार वृत्त |
मुंबई दि. १२ जुलै २०२४
दिवंगत बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत आणि त्याची माझी व्यवस्थापक दिशा सालीयान यांच्या पाठोपाठच्या मृत्यूने 2020 साली मोठी खळबळ माजली होती. यामध्ये शिवसेनेच्या एका मोठ्या नेत्याचा हात असल्याचा आरोप भाजपचे युवा नेते नितेश राणे यांनी तेव्हा केला होता, याबाबत आपल्याकडे माहिती असल्याचेही ते वारंवार सांगत आहेत. हे प्रकरण गुंडाळण्यात पोलिसांचा आणि तत्कालीन शासनाचा आरोप ही राणी यांनी केला आहे.
दरम्यान डिसेंबर मध्ये या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक नेमण्यात आले होते. मालाडमध्ये एका उच्च इमारतीच्या चौदाव्या मजल्यावरून उडी मारून सालीयानने आत्महत्या केल्याची माहिती सर्वत्र प्रसारित झाली होती. परंतु भाजपनेते नितेश राणे यांनी तेव्हा आणि आताही ही आत्महत्या नसून खून असल्याचा आरोप सातत्याने केला आहे. आता या प्रकरणात नितेश राणे यांना चौकशीसाठी नोटीस बजावली आहे. या नोटीसी बद्दल बोलताना राणी म्हणाले की,
"होय, आपल्याला याबाबत समन्स मिळालेले असून, जी काही माहिती आहे ती पोलिसांना देण्यासाठी संपूर्ण सहकार्य करण्यास तयार आहोत."
राज्य सरकारच्या निर्देशानंतर मुंबई पोलिसांनी दिशाच्या मृत्यूच्या चौकशीसाठी एस आय टी ची स्थापना केली असून पोलीस उपायुक्त अजय बंसल यांच्या मार्गदर्शनाखाली मालवणी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक चिमाजी आढाव हे या प्रकरणाची चौकशी करीत आहेत. राणे यांना या केस संदर्भात त्यांच्याकडे असलेल्या पुराव्याबद्दल चौकशी करण्यात येणार आहे.
ज्या चिमाजी आढाव यांच्याकडे या चौकशीची सूत्रे देण्यात आले आहेत, त्याच आढाव यांच्या बद्दल राणे यांची तक्रार आहे त्यांनी विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती आणि अतिरिक्त पोलीस आयुक्त राजीव जैन आढाव यांना वगळण्याची मागणी केली आहे.
या पार्श्वभूमीवर राणे काय पुरावा देतात हेही महत्त्वाचे असणार आहे. आता दिशा सालीयान यांचा मृत्यू 'खून की आत्महत्या ?' हे उघडकीस येते का, याकडे चित्रपटसृष्टीसह राज्यातील जनतेचे ही लक्ष लागून राहिले आहे.