Sangli Samachar

The Janshakti News

शेतकऱ्यांसाठी खुशखबर; आता दिवसाही अखंड वीजपुरवठा !


| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. ५ जुलै २०२४
शेतीला दिवसा मी सध्या या मागणीसाठी गेली कित्येक वर्ष शेतकरी राजा आपल्या विविध लोकप्रतिनिधी मार्फत शासनाकडे मागणी करीत होता. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार यांनी तर अनेक वेळेला याबाबतीत शासनाला धारेवर धरले होते आणि अनेक आंदोलने केली होती. अपुऱ्या वीज पुरवठ्यामुळे दिवसा शेतीला वीज पुरवठा करण्यात अडचणी येत होत्या. रात्रीच्या वेळी शेतीला पाणी देण्यासाठी जाण्याकरता शेतकऱ्यांना अनेक संकटांना सामना करावा लागायचा. यामध्ये साप व इतर प्राण्यांपासून धोका, छोटे मोठे अपघात, यामुळे झालेला होता. 

गेल्या कित्येक वर्षाची ही मागणी शासनाच्या नव्या योजनेनुसार आता पूर्ण होणार असून राज्यातील शेतकऱ्यांना आता दिवसाही अखंड वीज पुरवठा होण्याचा मार्ग खुला झाला आहे. 

"महाराष्ट्रात आपण सौर कृषी पंप योजना सुरु केली. या योजनेअंतर्गत आता ९ लाख पंपांचा लक्षांक उपलब्ध आहे. त्यामुळे वित्तमंत्र्यांनी मागेल त्याला सौर कृषी पंपाची घोषणा केली आहे. मागच्या वर्षी १ लाख १२ हजार लोकांना कनेक्शन दिले आहे. आता फक्त ३० हजार ८२१ मागणी बाकी आहे." अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पावसाळी अधिवेशना दरम्यान सभागृहात केली आहे.

याबाबत माहिती देताना देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, "सौर कृषी पंपामध्ये केंद्र सरकारचे ३० टक्के, राज्य सरकारचे ३० टक्के आणि ४० टक्के ग्राहकांचे पैसे होते. पण आता राज्य सरकारने एक निर्णय घेतला असून त्याद्वारे ३० टक्के केंद्र सरकारचे, ६० टक्के राज्य सरकारचे आणि शेतकऱ्यांकडून फक्त १० टक्के पैसे घेण्यात येणार आहे. तसेच अनुसूचित जाती आणि जमातीतील शेतकऱ्यांना केवळ ५ टक्के पैसे द्यायचे असून सरकार त्यांना ९५ टक्के पैसे सरकार देणार आहे. त्यामुळे यानिमित्ताने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल,"

 "जुनं कनेक्शन असणाऱ्यांना नव्याने पंप घेण्याची आवश्यकता नाही. त्यांच्या फिडरचेच सोलरमध्ये रुपांतर करण्यात येणार आहे. १८ महिन्यात ९ हजार मेगाव्हॅटचे फीडर सोलरवर जाणार आहेत. १८ महिन्यात ९ हजार मेगाव्हॅटचे कृषी फीडर सोलरवर जाणार असल्यामुळे शेतकऱ्यांना दिवसाची वीज उपलब्ध होणार आहे," असेही त्यांनी सांगितले. राज्य सरकारच्या या योजनेमुळे शेतकरी वर्गाची खूप मोठी होणार आहे.