Sangli Samachar

The Janshakti News

चांद्रयान-३ मोहीमेला जागतिक अंतराळवीर पुरस्कार, भारताची शान आकाशाच्या उंचीवर !



| सांगली समाचार वृत्त |
नवी दिल्ली - दि. २२ जुलै २०२४
भारताच्या चांद्रयान-३ मोहीमेने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीपणे पाऊल टाकत नवीन इतिहास घडवला. भारताच्या अंतराळ संशोधन संस्थेने प्रथमच चांद्रयान-३ मोहीमेच्या माध्यमातून चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर तिरंगा फडकवला असून, या ऐतिहासिक यशामुळे जगभरात भारताचा डंका वाजला. भारताच्या 'या' यशाची दखल जागतिक पातळीवर प्रथमच दखल घेण्यात आली असून, चांद्रयान-३ मोहीमेला जागतिक दर्जाचा 'जागतिक अंतराळ पुरस्कार' प्रदान करण्यात आला आहे.

इटलीतील अंतराळवीर परिषदेत पुरस्काराचे वितरण

भारताने चांद्रयान-3 या अंतराळयानाचे 23 ऑगस्ट 2023 रोजी चंद्रावर यशस्वी लँडिंग केले. या अंतराळ मोहीमेच्या यशाची आंतरराष्ट्रीय अंतराळवीर महासंघाकडून दखल घेत, जागतिक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. इटलीतील मिलान येथे सोमवार १४ ऑक्टोबर रोजी 75 वी आंतरराष्ट्रीय अंतराळवीर परिषद होणार आहे. या परिषदेत चांद्रयान-३ या मोहिमेला हा पुरस्कार देण्यात येणार आहे.


'हे' नवीन प्रयोगांसाठी जागतिक यश; इंटरनॅशनल एस्ट्रोनॉटिकल फेडरेशन

याविषयी माहिती देताना इंटरनॅशनल एस्ट्रोनॉटिकल फेडरेशनने सांगितले की, भारताशिवाय आतापर्यंत अमेरिका, रशिया आणि चीन चंद्रावर उतरले आहेत. इस्रोचे चांद्रयान-३ हे वैज्ञानिक प्रयोग आणि किफायतशीर अभियांत्रिकीचे अनोखे उदाहरण आहे. हे भारताच्या अवकाश संशोधनाच्या प्रचंड क्षमतेचे प्रतीक आहे. महासंघाने पुढे म्हटले आहे की, चांद्रयान-३ ने चंद्राची रचना आणि भूगर्भशास्त्रातील न पाहिलेले पैलू उघड केले आहेत. हे मिशन नवीन प्रयोगांसाठी जागतिक यश असल्याचे देखील महासंघाने स्पष्ट केले आहे.

जागतिक स्तरावर इतिहास घडवला

भारताने पाठवलेल्या चांद्रयान-3 ने 23 ऑगस्ट 2023 रोजी चंद्राच्या दक्षिणेकडील पृष्ठभागावर यशस्वी लँडिंग केले. देशाच्या इतिहासातील हा अभिमानाचा क्षण होता. चांद्रयान 3 मोहिमेच्या यशामागे, त्याचे प्रकल्प संचालक पी वीरामुथुवल आणि इस्रोमधील त्यांच्या टीमने रात्रंदिवस काम केले. यापूर्वी भारताने चांद्रयान-1 आणि चांद्रयान-2 प्रक्षेपित केले होते. मात्र तो यशस्वी होऊ शकले नाही. यानंतर चांद्रयान-३ पाठवण्यात भारताने यश मिळवत, जागतिक अंतराळ मोहिमांमध्ये नवीन इतिहास घडवला आहे.

इस्रो प्रमुखांनी यांचेही केले होते अभिनंदन

भारतीय अवकाश संशोधन संस्थेचे (इस्रो) प्रमुख एस. सोमनाथ यांनी चांद्रयान-३ मोहिमेच्या यशाचे श्रेय सर्व शास्त्रज्ञांना दिले होते. चांद्रयान-३ मोहिमेच्या या यशात देशाच्या अंतराळ संस्थेत नेतृत्व करणाऱ्या शास्त्रज्ञांच्या अनेक पिढीच्या योगदानाचाही त्यांनी उल्लेख केला. येत्या काही वर्षांत स्पेस एजन्सी अशाच प्रकारे मंगळावर यान उतरवेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.