Sangli Samachar

The Janshakti News

'हम नही सुधरेंगे', जीव धोक्यात घालून सेल्फीचा नाद मोबाईलमध्ये कैद, सावधगिरीची गरज !


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २२ जुलै २०२४
सध्या कृष्णा कोयना वारणा पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडत आहे. परिणामी या सर्व नद्यांना मोठ्या प्रमाणावर पाण्याला उधान आले आहे. परंतु त्याचबरोबर तरुणाईच्या जीव घेण्या सेल्फीच्या नादालाही उधान आल्याचे चित्र नदीकाठच्या अनेक गावातून दिसत आहे. या प्रकाराबद्दल नागरिकांमधून चिंता व्यक्त होत असून तरुणांनी आपला जीव धोक्यात घालू नये अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. 

मागील महिन्यातच सांगली येथील कृष्णा नदी सेल्फीच्या नादात एका तरुणाने आपला जीव गमावला. विविध ठिकाणच्या धबधब्या जवळ तर असे अपघात नित्याचेच. अशा परिस्थितीत बंधाऱ्यातून धबधब्यासारखा फील येऊ लागल्याने तरुण स्वतःचा जीव धोक्यात घालून फोटो काढण्यासाठी कृष्णाकाठी खरेदी करू लागले आहेत. असाच प्रकार सांगली जवळील कसबे डिग्रज येथे अनुभवास मिळत आहे. 


त्यामुळे आता पालकांनीच सतर्क होऊन रक्षकाची भूमिका घेण्याची गरज व्यक्त होत आहे. सध्या कृष्णा नदीच्या पाण्याला प्रचंड वेग असून, दुर्दैवाने कुणी तरुण या धारेत सापडला, तर मृत्यू ठरलेला. आणि म्हणूनच आता सर्वा काळजी घेण्याची गरज आहे. कारण पोलीस यंत्रणा अशा सर्व ठिकाणी पोहोचून अशा तरुणांना अडवू शकत नाही. ही भूमिका आता नदीकाठच्या नागरिकांनीच बजावण्याची वेळ आली आहे.