yuva MAharashtra आरेवाडी व केरेवाडी येथील दरोडेखोरांना अल्पावधीतच ठोकल्या बेड्या, पोलिसांचे कौतुक !

आरेवाडी व केरेवाडी येथील दरोडेखोरांना अल्पावधीतच ठोकल्या बेड्या, पोलिसांचे कौतुक !



| सांगली समाचार वृत्त |
कवठे महांकाळ - दि. ३० जुलै २०२४
कवठेमंकाळ तालुक्यातील आरेवाडी व केरेवाडी या गावामध्ये दरोडा घालणाऱ्या चार दररोजगारांना कवठेमंकाळ पोलिसांनी अल्पावधीत अटक केली असून एकूण पाच संशयित आरोपींना वेड्या ठोकल्या आहेत. पैकी लिहून येतील रहिवासी चारशिट्या भीमा शिंदे (वय 57) याच्या त्याच दिवशी मोजक्या आवळण्यात आल्या होत्या. त्यानंतर दंडोबा डोंगरातील परिसरात लपून बसलेल्या विनोद उर्फ उद्देश सुभाष पवार, श्रीनाथ सुभाष पवार, (वय 19) विष्णू सुभाष पवार (वय 20) (सर्व रा. भोसे ता मिरज) तसेच एका अल्पवयीन तर ताब्यात घेतले आहे अशी माहिती पोलीस उपअधीक्षक सुनील साळुंखे यांनी पत्रकार परिषदेत दिली.


27 जुलै रोजी आरेवाडी व केरेवाडी येथे रात्री अकरा ते तीनच्या दरम्यान दिगंबर करे यांच्यासह अन्य दोन घरात दरोडा टाकून तीन लाख 46 हजार 600 रुपयांचा सोने-चांदी दागिने यासह रोग रक्कम व मोबाईल असा ऐवज लंपास केला होता. यावेळी सर्वांनी तोंड बांधून हातात लाठी, काठी, कु-हाड चाकूने धाक दाखवीत जबरदस्तीने हे कृत्य केले होते. याप्रकरणी कवठेमंकाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. पोलिसांनी तात्काळ कारवाई करीत, वरील संशयतांना ताब्यात घेतले असल्याची माहिती पोलीस उपाधीक्षक सुनील साळुंखे यांनी यावेळी दिली.