Sangli Samachar

The Janshakti News

अजिंठा लेण्यातील सरकारी कर्मचाऱ्यांची माजोरी, जगासमोर घालवली लाज !



| सांगली समाचार वृत्त |
छत्रपती संभाजी नगर - दि. २२ जुलै २०२४
छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील अजिंठा लेणी ही भारतीय संस्कृतीची अजरामर कलाकृती. या ठिकाणच्या 29 लिहिण्यामध्ये बौद्ध लेण्यांचा समावेश आहे इस अपूर्व दुसरे शतक ते चौथ्या शतका दरम्यान या लेण्यांची निर्मिती झाल्याचा इतिहास सर्वश्रुत आहे. या ठिकाणी केवळ भारतातूनच नव्हे तर जगभरातून पर्यटक मोठ्या प्रमाणावर येत असतात. आणि म्हणूनच येथील पावित्र्य जपणे हे सर्वांचेच कर्तव्य आहे.

परंतु सध्या येथील कर्मचाऱ्यांनी केलेल्या कृत्याने या पर्यटन क्षेत्रासह भारताची नाचक्की होत आहे. येथील कर्मचारी नेहमी मद्यप्राशन करून फिरत असतात. अनेकदा त्यांच्या उद्धटपणाचा पर्यटकांना अनुभव आलेला आहे. वास्तविक देशाची प्रतिमा पर्यटकांसमोर उंचावण्याचे ही संधी असते. परंतु या संधीचा दुरुपयोग या कर्मचाऱ्यांकडून होत असल्याने सर्वत्र संताप व्यक्त होत आहे.

अजून था लेणीमध्ये कार्यरत असलेले सरकारी कर्मचारी मध्याच्या नशेत असून परदेशी पर्यटक फिरत असलेल्या ठिकाणी मद्यप्राशन करून काम करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. यासंबंधीचे अनेक व्हिडिओ सोशल मीडिया वरून वारंवार वायरल होत असतात. याबाबत संबंधित विभागाकडे अनेकांनी तक्रारी केल्या आहेत. परंतु या गंभीर प्रकाराची दखल ना येथील व्यवस्थापनाला आहे ना शासनाला. आणि म्हणूनच येथे भारतीय संस्कृतीची जाणीव असलेल्या जबाबदार अधिकाऱ्याची नेमणूक करावी अशी मागणी पर्यटकाकडून व लेणीप्रेमींकडून होत आहे.