| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. १५ जुलै २०२४
विशाळगडावरील अतिक्रमण काढून गडाचे पावित्र्य राखले गेले पाहिजे आणि त्याचा ऐतिहासिक पणाही जपला पाहिजे अशी छत्रपती संभाजी राजे यांची मागणी आहे. याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांशी व छत्रपती संभाजीराजे यांच्याशी ही बोलणे जाण्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. केवळ विशाळगडावरीलच नव्हे तर, राज्यातील प्रत्येक गडावरचा अतिक्रमण हटवून त्यांचा ऐतिहासिक पणा आणि पावित्र्य राखण्याचा शासनाचाही प्रयत्न आहे.
माजी खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी काल दिलेल्या विशाळगड भेटीवर बोलताना मुख्यमंत्र्यांनी विशाळगडावर झालेल्या दगडफेकीची योग्य ती चौकशी करून कारवाई करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.
दरम्यान विशाळगडावरील अतिक्रमण हटवण्यासाठी पश्चिम महाराष्ट्रातील हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाले आहेत. त्यामुळे वातावरण तणावग्रस्त आहे. नुकतेच हिंदू एकता आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष, माजी आमदार नितीन राजे शिंदे यांनीही शासनाला विशाळगडावरील अतिक्रमण हटवण्याबाबत विनंती केली होती.