Sangli Samachar

The Janshakti News

विधान परिषद निवडणुकीमध्ये मोठा राजकीय गेम होणार !


| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. ११ जुलै २०२४
सध्या विधान परिषदेच्या 11 जागांसाठी होत असलेल्या निवडणुकीत पडद्यामागील मोठ्या घटना घडत असून महाआघाडी आणि महायुती एकमेकांना धक्कातंत्र देण्याच्या मन:स्थितीत आहे. त्यामुळे या निवडणुकीच्या माध्यमातून मोठा राजकीय भूकंप घडण्याची चिन्हे दिसत आहेत. 

विधानसभेच्या 11 जागांसाठी उद्या 12 जुलै रोजी निवडणूक होत असून बारा उमेदवारांनी अर्ज दाखल केल्याने चुरस वाढली आहे. पक्षीय बलाबल पाहता महायुतीचे आठ उमेदवार या निवडणुकीत सहज निवडून येऊ शकतात पण त्यांनी नऊ जणांना उमेदवारी दिली आहे. म्हणूनच निवडणुकीत मोठा गेम होणार आहे.

या निवडणुकीत पक्षीय बलाबल पाहता महायुतीचे आठ उमेदवार अगदी सहज निवडून येऊ शकतात पण आपल्या नवव्या उमेदवारा राहील निवडून आणण्याचा चंग महायुतीच्या नेत्यांनी बांधला आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीच्या तिन्ही घटक पक्षाने प्रत्येकी एक उमेदवार दिला असून त्यांची निवड पक्की आहे. परंतु महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्याने मतांचा घोडा बाजार होण्याची शक्यता असल्याने महाविकास आघाडीच्या नेत्यांचे चिंता वाढली आहे.

एकीकडे या निवडणुकीचे सूत्रे असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दे धक्का तंत्र अवलंबण्याच्या तयारीत असले तरी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अबू आजमी व रईस शेख हे दोन आमदार आमदार गळाला लावले असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. नुकतीच या तिघांचे एक गुप्त बैठक झाल्याचे समजते. 

विधान परिषदेच्या या निवडणुकीवर आगामी विधानसभेचे गणित अवलंबून असल्याने महायुती आणि महाआघाडी या दोघांच्या दृष्टीने ही विधान परिषद महत्त्वाचे ठरत आहे. महायुतीचा नववा उमेदवार निवडून आलाच तर त्यांचे वजन वाढणार आहे पण त्यामुळे महाआघाडीला राजकीय धक्का बसू शकतो. आणि म्हणूनच या पार्श्वभूमीवर उद्या होणाऱ्या निवडणुकीकडे राजकीय विश्लेषकांचे लक्ष लागून राहिले आहे.