Sangli Samachar

The Janshakti News

कर्नाटकातील भाजपच्या खासदाराने मतदारांना बियरच्या बाटल्या वाटल्याने खळबळ !



| सांगली समाचार वृत्त |
चिक्कबल्लापूर - दि. ८ जुलै २०२४
कोणतीही निवडणूक म्हटली की, कार्यकर्त्यांची सरबराई ठेवावेत लागते. मग त्यामध्ये 'जीवनावळी आणि मद्य' हे ठरलेलं. यासाठी संभावित उमेदवाराने करोडो रुपये खर्च केल्याचे उदाहरणे आपल्याला नवी नाहीत. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत प्रत्येक उमेदवाराने आपल्या कार्यकर्त्यांची 'खास' काळजी घेतली होती. परंतु निवडून आल्यानंतरही 'श्रमपरिहार' करून कार्यकर्त्यांना खुश केले होते.

असाच एक प्रकार कर्नाटकातील चिक्कबल्लापूर जिल्ह्यात भाजपचे विद्यमान खासदार केस सुधाकर यांनी मतदारांचे विजयाबद्दल आभार मानण्यासाठी बियरच्या बाटल्या वाटल्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला असून, काँग्रेससह सर्वच विरोधी पक्षांनी भाजपा व के सुधाकर यांना धारेवर धरले आहे.


कथिच व्हिडिओ चिक्कबल्लापूर जिल्ह्यातील कार्यक्रमातील असल्याचा दावा करण्यात आला आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाला असून कार्यक्रमाची शेकडून लोकांना बियरच्या बाटल्या दिल्या जात असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे नीलमगलाजवळील भावी तेरे गावात माजी मंत्री एचडी हाऊसवर हा कार्यक्रम आयोजित केल्या गेला असल्याचे सांगितले जाते. कर्नाटकचे विरोधी पक्ष नेते आर अशोक, आमदार देवराज मुनीराजू यांच्यासह महत्त्वाचे नेते व कार्यकर्ते उपस्थित होते. आता यावरून कर्नाटकातील राजकीय वार गरम झाला आहे