Sangli Samachar

The Janshakti News

वीज ग्राहकांचा दरवाढीने शिमगा, कर्मचाऱ्यांची मात्र दिवाळी !


| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. ८ जुलै २०२४
एकीकडे महावितरण कंपनीने वीज दरवाढीचा शॉक दिल्याने ग्राहकावर शिमगा करण्याची वेळ आलेली असतानाच, महाराष्ट्र शासन ऊर्जा विभागाच्या अधिपत्याखालील वीज निर्मिती कंपनी, विद्युत वितरण कंपनी, आणि विद्युत पारेषण कंपनी यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या वेतनात मोठे वाढ केल्याने त्यांच्या घरी दिवाळी साजरी होणार आहे. महाराष्ट्र शासनाने मूळ वेतनात 19% व सर्व भत्त्यांमध्ये थेट 25% वाढ देत असल्याची माहिती सह्याद्री अतिथी ग्राहक झालेल्या वीज कंपन्यांचे अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बैठकीमध्ये उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की तिन्ही वीज कंपन्यांच्या अधिकाऱ्याने कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतन व भत्त्यांमध्ये वाढ करण्याचे अनेक दिवसांची मागणी होती. ती या निमित्ताने पूर्ण होत आहे तसेच सहाय्यकांनाही परिविक्षाधीन कालावधी करता 5000 रुपयांचे वाढ आणि तांत्रिक कर्मचाऱ्यांना मिळणारा 500 रुपयांचा भत्ता 1000 रुपये करण्यात आला असल्याची माहिती फडणवीस यांनी दिली.


या वेतन व भत्ता वाढीमुळे वीज निर्मिती, महावितरण, विद्युत पारेषण पुण्यातील अधिकारी व कर्मचारी वर्गामध्ये आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या आनंदाचे वातावरण आहे. परंतु शासनाने वीज ग्राहकांचाही विचार करण्याची गरज समाजातून व्यक्त होत आहे.