yuva MAharashtra महापालिकेच्या अशिक्षित कर्मचाऱ्यांनी पळवले सांगलीकरांच्या तोंडचे पाणी !

महापालिकेच्या अशिक्षित कर्मचाऱ्यांनी पळवले सांगलीकरांच्या तोंडचे पाणी !


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. १४ जुलै २०२४
सांगली महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडे असणाऱ्या अर्ध प्रशिक्षक व अशिक्षित कर्मचाऱ्यांच्या अभावामुळे वारंवार पाणी लिखेच्या घटना घडत असून पाणीपुरवठा विभागाने सांगलीकरांच्या तोंडचे पाणी पळवले आहे. सांगलीतील वॉटर बॉक्स मध्ये असणाऱ्या आठ पैकी सहा टाक्या पूर्णपणे बंद झाले आहेत..

वॉलमॅन व इतर अशिक्षित कर्मचाऱ्याकडून वाळूची हाताळणे करत असताना चूक झाल्यामुळे सदरच्या टाक्यांना जोडलेल्या पाईपलाईन पूर्णपणे सरकल्या असून त्याची नासधूस झाली आहे. शनिवारी सकाळी हिराबाग येथील 800 डी आय जॉईंट मोठ्या प्रमाणात लिकेज झाल्याने गावभाग, हरिपूर, हनुमान नगर, कोल्हापूर रोड, भरत नगर, गणेश नगर सिव्हिल हॉस्पिटल, खणभाग, पेठ भाग, उत्तर शिवाजीनगर, वखार भाग, कर्नाळ रोड अशी अर्धी सांगली पाण्याविना वंचित राहिली. 


पुढील तीन-चार दिवस असल्याने पाणीपुरवठा विस्कळीत राहणार असल्याने नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केलेल्या आहेत. किमान भविष्यात तरी अशी चूक होऊ नये म्हणून सांगली महापालिका पाणीपुरवठा विभागाकडे प्रशिक्षित कामगारांची नियुक्ती करावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे.