| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. १३ जुलै २०२४
मराठा योद्धा मनोज जरंगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबईमध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळावे व सग्या सोयऱ्यांचा अध्यादेश काढावा या मागणीसाठी मुंबई आझाद मैदानावर मोर्चा काढला होता. हा मोर्चा वाशी या ठिकाणी राज्य सरकारने थांबवण्यास सांगितले. मराठा समाजाच्या मागण्या आहेत, त्या सर्व मागण्या मान्य करण्यात येईल. असा आदेश मराठा योद्धा माननीय मनोज जरंगे पाटील यांना मिळाला होता. त्यामुळे वाशी या ठिकाणीच त्यांनी मराठा मोर्चा थांबण्याचा निर्णय घेतला होता.
परंतु या गोष्टीला आता एक वर्ष होत आले तरी अजूनही माननीय मुख्यमंत्री व राज्य सरकार यांनी कुठलीही दखल घेतली नाही व सग्यासोयऱ्याचा अध्यादेश काढला नाही. यासाठी प्रत्येक जिल्ह्यामध्ये मराठा योद्धा माननीय मनोज जरंगे पाटील हे अध्यादेश काढावा म्हणून आंदोलन करत आहेत, परंतु आम्ही वारीमध्ये सामील होऊन, याद्वारे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री व त्यांच्या मंत्रिमंडळाला इशारा देत आहे की, आपण दिलेला शब्द आपण पाळला नाही व वाशी येथे आपल्याला लावलेल्या गुलालाचा आपणच अपमान केल्यामुळे आम्ही येत्या 17 तारखेला पंढरपूर येथे आषाढी एकादशी दिवशी आपल्या हस्ते होणारी शासकीय महापूजा करण्यापासून आपणास रोखणार आहेत. अशी माहिती मराठा स्वराज्या संघाचे राज्य प्रवक्ते माननीय संतोष पाटील यांनी नातेपुते येथे संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या पालखीमध्ये व वारीमध्ये सामील होऊन आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या आहेत.