| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. १६ जुलै २०२४
आषाढी असो वा कार्तिकी, पंढरपूरच्या वारीमध्ये लाखो वारकरी विठुरायाच्या दर्शनासाठी येत असतात. यामध्ये पायी वारी करण्याची मोठी परंपरा आहे. ऊन, वारा, पाऊस यांचा सामना करीत हे वारकरी आळंदी ते पंढरपूर या महामार्गावरून शारीरिक, मानसिक दुःख विसरून आपल्या लाडक्या विठुरायाच्या दर्शनासाठी येतात.
जोपर्यंत शारीरिक ताकत असते, तोपर्यंत आपला व्यवसाय, नोकरी आणि अन्य काम बाजूला ठेवून हे वारकरी मोठ्या संख्येने पायी वारीत सहभागी होतात या वारीमध्ये अगदी 'नव्वदीतील तरुण'ही जेव्हाही पूर्ण करतात तेव्हा आश्चर्यास पारावर राहत नाही.
आणि म्हणूनच अशा आनंददायी वयोवृद्धांसाठी शासनाने वारकरी महामंडळ सुरू करण्याचा कौतुकास्पद निर्णय घेतला आहे. या अंतर्गत वारीदरम्यान अनेक सुविधा पुरविण्यात येणार आहेतच परंतु त्याचबरोबर आता मासिक पेन्शन ही सुरू करण्यात येणार आहे. या महामंडळाचे मुख्यालय हे पंढरपूर येथे असेल. महामंडळावर कार्यरत किंवा सेवानिवृत्त भारतीय प्रशासन सेवेतील अधिकाऱ्यांची व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती करण्यात येईल. या महामंडळाला ५० कोटींचे भागभांडवल देण्यात येणार आहे. त्यामुळे वारकऱ्यांमध्ये आनंदाचे व समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रत्येक वारकऱ्यांकडून मुख्यमंत्री व दोन्ही उठून मुख्यमंत्र्यांचे कौतुकही करण्यात येत आहे.
महामंडळाच्या योजना
सर्व पालखी मार्गांची सुधारणा, स्वच्छता, आरोग्य, निवारा व सुविधा यासाठी दरवर्षी आर्थिक तरतूद करून नियोजन.
आषाढी व कार्तिकी वारीसाठी येणाऱ्या वारकऱ्यांना सुरक्षा, विमा संरक्षण कवच.
वारकरी भजनी मंडळाला भजन व कीर्तन साहित्यासाठी (टाळ, मृदंग, वीणा आदी) अनुदान.
कीर्तनकारांना आरोग्य विमा, मानधन सन्मान योजना.
पंढरपूर, देहू, आळंदी, मुक्ताईनगर, सासवड, पिंपळनेर, त्र्यंबकेश्वर, पैठण, कोल्हापूर संस्थान, शेगाव, तारकेश्वर, भगवानगड, अगस्तऋषी, संत सावतामाळी समाज मंदिर, अरण (ता. माढा, जि. सोलापूर) व इतर तीर्थक्षेत्रांचा विकास.
चंद्रभागा, इंद्रायणी, गोदावरी व इतर नद्या प्रदूषणमुक्त करण्याबाबतची कार्यवाही.