| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ८ जुलै २०२४
सेल्फी मुळे जीव जाऊ शकतो हे ठाऊक असूनही तरुणाई अजूनही शहाणी व्हायला तयार नाही. सांगलीतील शामराव नगर येथे राहणाऱ्या या तरुणाला आपला जीव सेल्फीच्या नादात गमवावा लागला. येथील कृष्णा नदीवरील सांगलीवाडीकडील बाजूस असणाऱ्या बंधार्यावर मैत्रिणी समवेत सेल्फी घेताना, सकाळी साडेदहाच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. मैत्रिणींनीने हा प्रकार नातेवाईकांना कळविल्यानंतर आयुष्य हेल्पलाइन टीम, स्पेशल टीमच्या वतीने हरिपूरपर्यंत मोईनचा शोध घेण्यात आला, परंतु सायंकाळपर्यंत त्याचा भाव ठिकाण समजू शकला नाही.
याबाबत अधिक माहिती अशी की, मोहीम हा सांगलीतील एका मैत्रिणीबरोबर रविवारी सकाळी कृष्णा नदीच्या काठावर आला होता. सांगलीवाडीच्या बाजूने तो मैत्रिणीसह चालत बंधाऱ्यावर आला. तेथे दोघेजण सेल्फी घेत होते, तेव्हा तो जाऊन नदीपात्रात पडला. सध्या पावसामुळे नदीच्या पाण्याला चांगलाच वेग होता. तशात त्याला पोहता येत नसल्यामुळे तो पाण्याबरोबर वाहून जाऊ लागला. मैत्रिणीने आरडाओरडा केल्यानंतर काही जण बंधाऱ्याकडे धावलेही. परंतु मोईन हा पाण्याच्या धारेला लागून दूरवर गेला होता. त्यावेळी मैत्रिणीने मोबाईल वरून नातेवाईकांना हा प्रकार कळविला.
सांगली शहर पोलिसांना ही माहिती मिळताच, त्यांनी ही घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर आयुष हेल्पलाइन टीम, स्पेशल रेस्क्यू फोर्स आणि महापालिका अग्निशमन दलाचे जवानही पोहोचले. त्यांनी बोटीवरून हरिपूर पर्यंत शोध घेतला. परंतु नदी प्रवाहातील पाणी वाढले असल्याने मोईनचा पत्ता लागू शकला नाही.