| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ३० जुलै २०२४
वार्ड क्रमांक 17 मध्ये माळी मंगल कार्यालय, चांदणी चौक, सांगली या ठिकाणी सामाजिक कार्याचा वसा घेतलेले व शोले स्टाईल म्हणून प्रसिद्ध असलेले पत्रकार दीपक चव्हाण यांचा वाढदिवस शाल श्रीफळ, गुच्छ व केक कापून मराठा स्वराज्य संघाचे राज्य प्रवक्ते संतोष पाटील यांच्या हस्ते वाढदिवस साजरा करण्यात आला.
यावेळी राज्य प्रवक्ते संतोष पाटील म्हणाले की, सांगली, मिरज व कुपवाड महानगरपालिकेचे ब्रँड अँबेसिडर, नेहरू युवा केंद्र भारत सरकारचे जिल्हा समिती सदस्य, एस टी महामंडळाचे जिल्हा समितीचे सदस्य, इंडिया बुक रेकॉर्ड होल्डर, सांगलीमध्ये बऱ्याच ठिकाणी रस्त्यावरती डिव्हायडरवर पांढरे पट्टे नसल्यामुळे वाहनधारकांना ते दिसत नव्हते, त्यामुळे अपघात होत होते. तेव्हा स्वखर्चातून दीपक चव्हाण व त्यांचे सहकार्याने रस्त्यावरील डिव्हायडरवर पांढरे पट्टे मारले. ही सामाजिक भावना त्यांनी डोक्यात ठेवून महत्त्वाचे काम केले आहे.
तसेच वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांच्या समस्या सोडवून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचे काम करणारे तसेच, त्यांच्या मुलांच्या समस्या सोडवणे त्यांच्या आरोग्याच्या समस्या सोडवणे हे काम गेले अनेक वर्ष झाले, आम्ही पाहत आहोत. अशा या समाजकार्याचा वसा व वारसा असलेले शोले स्टाईल म्हणून प्रसिद्ध असलेले दीपक चव्हाण व त्यांचा बंधू सतीश चव्हाण ही सांगलीतील जय-वीरुची जोडी आहे. असं वक्तव्य माननीय राज्य प्रवक्ते संतोष पाटील यांनी वाढदिवसानिमित्त केले.
यावेळी अनेक राजकीय, सामाजिक, प्रशासकीय, सांगली शहरातील, महानगरपालिका विभागातील सर्वांनी दीपकला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.