| सांगली समाचार वृत्त |
मिरज - दि. २ जुलै २०२४
आपल्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी आंदोलनाचे विविध मार्ग विविध संघटना व पक्ष अवलंबत असतात. यापैकीच एक म्हणजे 'रास्ता रोको' आजपर्यंत विविध पक्ष व संघटनांनी केलेले रास्ता रोको आंदोलन आपण पाहिले आहेत. परंतु मिरज तालुक्यातील कळंबी येथील एक आंदोलन सध्या चर्चेचा केंद्रबिंदू ठरत आहेत.
मध्यंतरी जत येथील कन्नड शाळेत मराठी शिक्षकांची नेमणूक करून जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने चर्चेला तोंड फोडले होते. आता मिरज तालुक्यातील कळंबी जिल्हा परिषद शाळेत व कार्यक्षम शिक्षकाचे नेमणूक केल्याने विद्यार्थी व पालकांमध्ये नाराजी होती. याबाबत या शिक्षकाचे बदली करावी म्हणून जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडे विनंत्या, अर्ज याद्वारे मागणी केली होती. परंतु शिक्षण विभागाने त्याकडे लक्ष दिले नाही. आणि म्हणून कळंबीतील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी आपल्या पालकांसह रस्त्यावर उतरले आणि त्यांनी चक्क 'रास्ता रोको'चे अस्त्र उपसले.
मिरज तालुक्यातील कळंबी जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांना गुणवत्ता यादीत आणणाऱ्या शिक्षकाची बदली करून त्याठिकाणी अकार्यक्षम शिक्षकाचे नेमणूक केली होती. त्यामुळे मुलांचे नुकसान होईल असा आरोप शाळा शिक्षण व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष चंद्रकांत दळवी यांनी केले व शैक्षणिक व्यवस्थापन समिती, ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांनी प्रशासनाच्या विरोधात चक्क गाव बंद करीत रस्त्यावर उतरून आंदोलन केले. आता प्रशासन याची दखल घेत या कार्यक्षम शिक्षकाचे बदले अन्यथा करते की काय भूमिका घेते याकडे कळलीस संपूर्ण तालुक्यातील शिक्षण विभागाचे लक्ष लागून राहिलेले आहे.