| सांगली समाचार वृत्त |
सांगली- दि. १२ जुलै २०२४
सरकार गोल गोल फिरवून पुन्हा रिक्षाचालकमालकांचा खिसा कापणार असेल तर काँग्रेसचे सहन करणार नाही रिक्षा चालक मालकांना सोबत घेऊन पुन्हा रस्त्यावर उतरावा लागेल असा इशारा काँग्रेसचे सांगली शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी शासनाला दिला आहे. सध्या रिक्षा परवाना विलंब शुल्काच्या विषयावरून वातावरण चांगलेच तापले आहे. काल याच प्रश्नावरून रिक्षा संघटनांनी बेमुदत बंदचे हत्यार उपसले होते. त्यामुळे नागरिकांना बरच समस्यांना तोंड द्यावे लागले. संध्याकाळी हा अन्यायकारक कायदा भाषणात बांधल्याचा निरोप राज्याच्या राजधानीतून सांगलीत पोहोचला आणि रिक्षा रस्त्यावर धावू लागल्या.
राज्य शासनाने रिक्षा परवाना विलंब प्रतिदिन पन्ना आकारणीचा निर्णय घेतला त्यामुळे रिक्षा मालकांचे कोंडी झाले असून संबंधितांना रिक्षा विकली तरी शुल्क भरता येणार नाही अशी अवस्था आहे अशावेळी सांगलीचा आवाज अर्थात पृथ्वीराज बाबा पाटील यांनी हा विषय हाती घेतला आणि ते कोणताही विचार न करता कष्टकरी जनतेसाठी रस्त्यावर उतरले.
जिल्हाधिकारी, आरटीओ यांच्या माध्यमातून हा प्रश्न धासास लावून सोडवण्यासाठी रान उठवले. सध्या हा प्रश्न सुटला असल्याचे सांगितले असले तरी राज्य शासनाने या आदेशाला फक्त स्थगिती दिली आहे, पुढील आदेश अद्याप बाकी आहे. तो अन्याय कार्य असू नये यासाठी सतर्क राहण्याचे गरज पृथ्वीराज बाबा यांनी व्यक्त केले आहे. म्हणूनच हा आदेश केवळ स्थगित नव्हे तर तो रद्द झाला पाहिजे असे मागणे पृथ्वीराज बाबा पाटील यांनी केले आहे. हा कायदा रद्द झाला नाही तर रिक्षा चालक मालकांना सोबत घेऊन आपण पुन्हा रस्त्यावर उतरू असा इशारा आहे पृथ्वीराज बाबा यांनी दिला आहे.