| सांगली समाचार वृत्त |
नवी दिल्ली - दि. २९ जुलै २०२४
आपण आपल्या अतिरिक्त उत्पन्नासाठी आपल्या मालकीचा दुकान गाळा, किंवा मग आपले घर भाड्याने देत असतो. वाढत्या महागाईच्या काळात, 'बुडत्याला काडीचा आधार' एकदा मागील कारण. पण अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात एक तरतूद केलेली आपणास ठाऊक आहे का ? जर नसेल तर खालील बातमी तुमच्यासाठी.
घर किंवा दुकान भाड्याने दिल्याने मिळणारे उत्पन्न हे आयकर भरताना, गृहनिर्माण मालमत्तेतून मिळणाऱ्या उत्पन्नात समाविष्ट केले जाणे आवश्यक आहे. आता हे उत्पन्न व्यवसायाचे उत्पन्न म्हणून दाखवता येणार नाही. निवासी मालमत्ता भाड्याने दिल्याने मिळणारे उत्पन्न हे व्यवसाय केव्हा व्यवसायातून मिळणाऱ्या उत्पन्नापेक्षा 'गृह संपत्ती उत्पन्न अंतर्गत' दाखवावे लागणार आहे.
काही कर्जाते भाड्याच्या घरातून मिळणारे उत्पन्न हे व्यवसायाचा किंवा व्यवसायातील नफा म्हणून दाखवित असतात. त्यामुळे त्यांना करातून सूट मिळते. ही तरतूद काही मालमत्ताधारकांना भाड्याचे उत्पन्न व्यवसायिक उत्पन्न म्हणून दाखविण्याची परवानगी देते. यामुळे देखभाल खर्च, दुरुस्ती यामध्ये कपातीचा दावा केला जाऊ शकतो. अशा प्रकारे उत्पन्नाचा चुकीचा अहवाल देऊन करते त्यांचे करपात्र उत्पन्न कमी करतात त्यामुळे त्यांना कमी कर भरावा लागतो आणि शासनाचे नुकसान होते.
केंद्र सरकार कलम 28 मध्ये सुधारणा करण्याचा प्रस्ताव मांडणार आहे. यानंतर करदात्याला भाड्याचे उत्पन्न व्यवसायिक उत्पन्न म्हणून दाखवता येणार नाही. व्यवसाय किंवा घराचे मालमत्ता मिळकत हे अंतर्गत देय असणार आहे. ही नवी तरतूद पुढील आर्थिक वर्षापासून म्हणजे एक एप्रिल 2025 पासून लागू होईल या नव्या नियमामुळे आयकरता त्यांना चुकीच्या उत्पन्नाच्या नावाखाली कमी कर भरण्यापासून रोखता येणार आहे.