yuva MAharashtra ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर !

ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर !



| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ३ जुलै २०२४
राज्यातील माहे जानेवारी 2024 ते डिसेंबर 2024 या कालावधीत मुदत संपणाऱ्या, नवनिर्मित, मागील निवडणुकांमध्ये चुकीची प्रभागरचना झाल्यामुळे तसेच बहिष्कार व इतर कारणांमुळे निवडणुका न होऊ शकलेल्या सुमारे 1 हजार 588 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक तसेच निधन, राजीनामा, अनर्हता किंवा इतर अन्य कारणांमुळे ग्रामपंचायतीतील सदस्य / थेट सरपंचाच्या रिक्त झालेल्या जागांच्या पोटनिवडणुकांसाठी पारंपारिक पध्दतीने राबविण्यात यावयाच्या मतदार यादीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने घोषित केला आहे.


एप्रिल-मे 2024 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणूक 2024 साठी वापरलेली विधानसभेची मतदार यादी यापुढे होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक/पोटनिवडणुकांसाठी मतदार यादी तयार करण्यासाठी वापरण्यात येणार आहे.

 या निवडणुकांकरिता पारंपारिक पध्दतीने राबविण्यात यावयाचा मतदार यादीचा कार्यक्रम पुढीलप्रमाणे. प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी प्रसिध्द करण्याचा दिनांक मंगळवार, 9 जुलै 2024. हरकती व सूचना दाखल करण्याचा कालावधी मंगळवार, 9 जुलै 2024 ते सोमवार, 15 जुलै 2024 पर्यंत आणि प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी प्रसिध्द करण्याचा दिनांक शुक्रवार, 19 जुलै 2024 असा असल्याचे उपजिल्हाधिकारी (महसूल) राजीव शिंदे यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.