Sangli Samachar

The Janshakti News

रेल्वेचे जनरल मॅनेजर राम करण यादव यांच्यासमोर सतीश साखळकर यांनी सांगलीकरांची मांडली व्यथा !


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २२ जुलै २०२४
रेल्वेचे जनरल मॅनेजर राम करण यादव हे आज सांगली रेल्वे स्टेशनच्या कामकाजाची पाहणी करण्याकरता आले होते. यावेळी नागरिक कृती समितीच्या सदस्यांनी त्यांची भेट घेऊन सांगलीकरांच्या व्यथा त्यांच्यासमोर मांडल्या.

यावेळी यादव यांना सांगली पुणे मार्गावर सुरू असलेल्या काही गाड्यांना सांगली व किर्लोस्करवाडी रेल्वे स्टेशनवर स्टॉप देण्याबाबतचे निवेदन दिले, यामध्ये काही नवीन गाड्या सुरू करण्याबाबतची मागणी करण्यात आली आहे. सध्या या मार्गावरील कामे संथ गतीने सुरू असून त्याबाबत ही सूचना करण्याची विनंती केली असून सांगलीकरांचा सध्याचा सर्वात जिव्हाळ्याचा प्रश्न म्हणजे चिंतामणी नगर उड्डाणपुलाचा. यावेळी समितीच्या सदस्यांनी या पुलाच्या अपूर्ण कामकाजाबाबत गाऱ्हाणे मांडले व हा उड्डाणपूल वेळेत पूर्ण होण्याची गरज प्रतिपादन केली.


यावेळी राम करण यादव यांनी या समस्या जाणून घेऊन त्या तात्काळ सोडवण्याबाबत समितीच्या सदस्यांना आश्वस्थ केले. यावेळी सतीश साखळकर, माजी नगरसेवक संतोष पाटील, सामाजिक कार्यकर्ते गजानन साळुंखे आदि उपस्थित होते.