| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २३ जुलै २०२४
शिक्षण... विशेषतः उच्च दर्जाचे शिक्षण आपल्या पाल्याला मिळावे, त्याची चौफेर प्रगती व्हावी, त्याने मोठ्या पदावर पोहोचावे ही प्रत्येक माता-पित्याची अपेक्षा असते. यासाठी ते रात्रंदिवस कष्टही घेत असतात. आपल्या पाल्याला शहरातील प्रसिद्ध शाळेत ते दाखल करतात. यासाठी हजारो रुपयांचे तीही भरतात. परंतु जेव्हा त्यांचे प्रगती पुस्तक पाहिले जाते तेव्हा त्यावरील शेरे पालकांच्या चेहरे चिंताग्रस्त बनत आहेत.
शहरातील अनेक नामांकित शिक्षण संस्थांतील मुलांची तुलनात्मक प्रगती पाहता, पालकांचे निराशा होत आहे त्यांचा बौद्धिक विकास खुंटला जात असल्याची तक्रार त्यांच्यातून होत आहे. 'केवळ पुढील ढकलणे' ही औपचारिकता शासनाच्या निर्णयाच्या आडून होत असल्याचेही बोलले जाते. कारण दहावीपर्यंत एकही विद्यार्थी मागील वर्गात राहू नये हा शासन निर्णय यामागे कारणीभूत ठरल्याची चर्चा आहे.
काही शाळांची प्रसिद्धी टकाटक, शाळा व वर्गांची स्थिती चकाचक... परंतु विद्यार्थ्यांची गुणवत्ता मात्र प्रश्नार्थक ? अशी परिस्थिती असल्याचे चर्चा सांगली परिसरात पालकांमधून ऐकू येत आहे. यावर देखरेख याची जबाबदारी असलेला शिक्षण विभाग आपल्या कर्तव्यात (?) मग्न... पालकांच्या रोषास कारणीभूत असलेल्या शाळा वर व त्यांच्या संस्था चालकांवर कोणाचाच वचक राहिलेला नाही. परिणामी या साऱ्या परिस्थितीत जबाबदार कोण असा प्रश्न पालक वर्गातून उमटत आहे.