Sangli Samachar

The Janshakti News

संभाजीराव भिडे वटसावित्रीच्या पूजेवरून महिलांवर केले वादग्रस्त विधान !


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. १ जुलै २०२४
संभाजीराव भिडे हे आपल्या रोखठोक आणि वादग्रस्त विधाने नेहमीच चर्चेच्या केंद्रस्थानी असतात. अनेक वेळा त्यांच्यावर याबाबत टीकाच नव्हे तर गुन्हेही दाखल झाले आहेत. नुकत्याच त्याने केलेल्या एका वादग्रस्त विधानामुळे ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.

संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे जल्लोषात स्वागत होणार आहे. या पालखीत सहभागी होण्यासाठी संभाजीराव भिडे हे पुण्यात पोहोचले जे एम रोडवरील जंगली महाराज मंदिरात दर्शन घेतल्यानंतर धारकऱ्यांना संबोधित करताना त्यांनी म्हटले आहे की "वटसावित्रीच्या पूजेला नट्यांनी आणि ड्रेस घातलेल्या महिलांनी जाऊ नये साडी घातलेल्या महिलांनी केवळ वटसावित्रीच्या पूजेला जावे." त्यांच्या या निर्भीड वक्तव्यामुळे पुन्हा वाद निर्माण होण्याचे शक्यता वर्तवली जात आहे.


दरम्यान पालखीला मानवंदन करताना कायदा व सुव्यवस्था भंग होणार नाहीत याची काळजी घ्यावी तसेच तेढ निर्माण करणारी वक्तव्य करू नयेत अशा सूचना देणारे नोटीस संभाजीराव भिडे यांना पुणे पोलिसांनी पाठवलेली आहे. या नोटीसीच्या पार्श्वभूमीवर संभाजीराव भिडे यांनी केलेल्या वक्तव्यावरून महिला संघटना आणि पोलीस काय भूमिका घेतात साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.