Sangli Samachar

The Janshakti News

बंधू-भगिनींनो सर्वांनी धिराने संभावित संकटाला सामोरे जाऊया - पृथ्वीराज पाटील


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २४ जुलै २०२४

कोयना धरण आणि कृष्णा नदीच्या पाणलोट क्षेत्रात हवामान विभागाने रेड अलर्ट दिला आहे. वारणा नदीच्या पाणलोट क्षेत्रात यावर्षी २३ वेळा अतिवृष्टी झाली आहे. पुढील आठवडाभर या सर्वच भागांत मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला असून त्यामुळे कृष्णा आणि वारणा नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता आहे. सांगलीकरांना महापुराचे संकट नवे नाही. सन २००५, २०१९ आणि २०२१ साली अत्यंत धैर्याने आपण या संकटाचा सामना केला. यावर्षी देवकृपेने असे संकट येणार नाही, अशी प्रार्थना करूया, पण तशी वेळ आलीच तर सांगलीकरांनी अजिबात घाबरून जाऊ नये. जिल्हा प्रशासन, संपूर्ण काँग्रेस कार्यकर्त्यांची फळी, आमचे पृथ्वीराज पाटील फौंडेशन आणि सांगलीतील तमाम सामाजिक संस्था, संघटना आपल्या सोबत उभ्या आहेत. संकट कोणत्याही स्वरुपाचे असो, तुमची एक हाक पुरेशी आहे, आम्ही तुमच्या मदतीला धावून येऊ. संकट आलेच तर त्याला धैर्याने आपण मिळून ते परतावून लावू. सांगलीकर नेहमीच खंबीर होता, आहे आणि राहील, याबद्दल तीळमात्र शंका नाही. आपण सावध रहा, एवढीच कळकळीची विनंती.

पृथ्वीराज गुलाबराव पाटील
अध्यक्ष सांगली शहर जिल्हा काँग्रेस कमिटी

सांगलीतील पुरविषयीच्या मदतीसाठी खालील हेल्पलाइन नंबरशी संपर्क करा
मो.8055 85 7711
मो.9822 88 2861
मो.9657 96 2301
मो.9588 41 3100


*सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका*
महापालिका मध्यवर्ती आपत्ती व्यवस्थापन कक्ष
*वॉर रुम (आपत्ती व्यवस्थापन कक्ष)* 🌊
📞संपर्क क्रमांक
7066040330
7066040331
7066040332
   
*मदत व बचावकार्य कक्ष*                                                                                           
🚒 *अग्निशमन दल* 🚒

📞संपर्क क्रमांक
टिंबर एरिया, सांगली 
0233-2373333
स्टेशन चौक, सांगली 
0233-2325612
कमानवेस, मिरज
0233-2222610  

दिनांक - 24 जूलै, 2024                         

आयर्विन पूल, सांगली (पाणी पातळी) 
*दुपारी 1.30 वाजता*

🌊 आयर्विन पूल, सांगली येथील *पाणी पातळी 30 फुट 00 इंच*

🌊 आयर्विन पूल, सांगली येथील *इशारा पातळी 40 फूट*

🌊 आयर्विन पूल, सांगली येथील *धोका पातळी 45 फूट*

कृष्णाघाट पूल, मिरज (पाणी पातळी)
*दुपारी 01.30 वाजता*

🌊 कृष्णाघाट पूल, मिरज येथील *पाणी पातळी 43 फुट 00 इंच*

🌊 कृष्णाघाट पूल, मिरज येथील *इशारा पातळी 45 फूट*

🌊 कृष्णाघाट पूल, मिरज येथील *धोका पातळी 57 फूट*