| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २४ जुलै २०२४
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकत्याच पार पडलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात लाडकी बहीण योजना सादर केली होती. यामध्ये पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये पंधराशे रुपये जमा केले जाणार आहेत. ही रक्कम मिळवण्यासाठी, कागदपत्रांची जुळवाजुळव करताना महिलांची होणारी फरपट लक्षात घेऊन मुख्यमंत्र्यांनी यात अनेक बदल केले. तरीही अजून काही त्रुटी राहिल्या होत्या. ज्या आता दूर करण्यात आल्या असून या योजनेत आणखीन सहा बदल करण्यात आले आहेत.
परंतु 'लाडक्या बहिणी' प्रमाणेच मुख्यमंत्र्यांनी आशा स्वयंसेविकासाठीही महत्त्वपूर्ण पाऊल उचलले असून, यामुळे आशा स्वयंसेविकांचा मोठा फायदा होणार आहे. नव्या योजनेनुसार अशा स्वयंसेविकासाठी सानुग्रह अनुदान देण्याची योजना आमदार येणार असून त्यानुसार एखादी महिला कामावर असताना मृत्यू झाल्यास दहा लाखांची तर कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास पाच लाखांचे आर्थिक मदत देण्यात येणार आहे.
आशा स्वयंसेविकांनी सातत्याने विविध मागण्यांसाठी आंदोलने, रास्ता रोको, घंटा नाद अशा विविध मार्गाने सरकार दरबारी आपले म्हणणे मांडले होते. या मागण्यांबाबत सकारात्मक असल्याचे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, आशा स्वयंसेविकांना हे सरकार न्याय देईल. योग्य वेळी याबाबत नियमात आवश्यक ते बदल करून या मागण्या मान्य करण्याचा प्रयत्न करण्यात येईल पण तत्पूर्वी सानुग्रह अनुदानातून या भगिनींना भाऊबीज देण्यात येईल.