yuva MAharashtra जयश्रीताईंनी आमदारकीवर सांगितला दावा, आ. विश्वजीत कदम, खा. विशाल पाटील यांच्या भूमिकेकडे लक्ष !

जयश्रीताईंनी आमदारकीवर सांगितला दावा, आ. विश्वजीत कदम, खा. विशाल पाटील यांच्या भूमिकेकडे लक्ष !


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. १५ जुलै २०२४
सांगली जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्या आणि स्व. मदन भाऊ पाटील यांच्या सुविद्य पत्नी जयश्रीताई पाटील यांनी "प्रत्येक कार्यकर्त्याला जनतेतून आमदार व्हावे असे वाटत असते, मागील दोन वेळा आम्हाला थांबण्यास सांगितले. आम्ही थांबलो. परंतु आता मदन भाऊ पाटील यांच्या कार्यकर्त्यांची तीव्र इच्छा आहे की जयश्री ताईंनी आमदारकीसाठी पुढे यायला हवे !" असे वक्तव्य करून आमदारकीच्या रणांगणात उडी घेतली आहे.

सांगली विधानसभा मतदारसंघातच नव्हे तर संपूर्ण सांगली जिल्ह्यात मदन भाऊंना मानणारा मोठा कार्यकर्ता व समाज आहे. यापूर्वीच्या अनेक निवडणुकीत या गटाने आपली ताकद दाखवली आहे. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत, सांगली विधानसभा मतदारसंघातून 25 हजाराहून अधिक मताधिक्य देण्यात मदनभाऊ गटाचा मोठा वाटा आहे. महापालिका, जिल्हा परिषद, जिल्हा मध्यवर्ती बँक, मार्केट कमिटी आदी सत्ता स्थानी मदन भाऊ गट सक्रिय आहे. या गटाच्या माध्यमातून आप आपल्या परिसरातील ताकद काँग्रेसच्या मागे उभे करीत आला आहे.


गट निवडणुकीत अत्यल्प मतांनी विजय हुकलेल्या सांगली शहर जिल्हा अध्यक्ष पृथ्वीराज बाबा पाटील यांनी पराजय पचवून आपला गट एकसंघ ठेवला आहे. शहर व विधानसभा मतदार संघातील नागरिकांच्या समस्याला धावून जात वाचा फोडण्याचे काम पृथ्वीराज बाबांनी केलेले आहे. विविध आंदोलनाच्या माध्यमातून त्यांनी वंचितांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला आहे. गुलाबराव पाटील चांगला जनसंपर्क निर्माण केला आहे. 

त्यामुळे जयश्री ताईंनी घेतलेली ही भूमिका आ. डॉ. विश्वजीत कदम आणि खा. विशाल पाटील हे काय भूमिका घेतात, यावर विधानसभा निवडणुकीतील रणसंग्राम अवलंबून आहे.