yuva MAharashtra विट्यातील आरती ज्वेलर्समधून तीन लाख रुपये लंपास करणाऱ्या बंटी बबलीला अटक !

विट्यातील आरती ज्वेलर्समधून तीन लाख रुपये लंपास करणाऱ्या बंटी बबलीला अटक !


| सांगली समाचार वृत्त |
विटा - दि. १६ जुलै २०२४
सहा महिन्यापूर्वी विटा येथील सराफ बाजारातील आरती ज्वेलर्सच्या काउंटर मधून तीन लाख रुपये घेऊन उभारा केलेल्या 'बंटी बबली' ला विटा पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून सव्वा तीन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की विटा येथील सराफ पेटीतील आरती ज्वेलर्सच्या काउंटर मधून सातारा येथे राहणाऱ्या विश्वास हनुमंत गुजर आणि पूजा विश्वास गुजर या दांपत्याने तीन लाख रुपयाची रोकड लंपास केल्याची तक्रार पोलिसात दाखल झाले होते या चोरीच्या तपासासाठी पोलीस निरीक्षक शरद मेमाणे यांनी गुन्हे प्रकटीकरण पथकास सूचना दिल्या होत्या. त्यानुसार पथकातील हवालदार प्रमोद साखरपे, महेश संकपाळ, अक्षय जगदाळे यांना सातारा येथील या बंटी बबलीची टिप मिळाली होती. 


त्याप्रमाणे काल या पथकाने संशयित विश्वास हनुमंत गुजर आणि पूजा विश्वास गुजर या सातारा येथील दांपत्यास सापळा रचून ताब्यात घेतले. त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता, त्यांनी वरील गुन्ह्याची कबुली दिली. त्यानुसार त्याला अटक करण्यात आले असून त्यांच्याकडे पूर्वक रक्कम एक लाख 55 हजार रुपये आणि चोरीच्या रकमेतून खरेदी केलेली 90 हजार रुपयांची कार (एम एच 04 - DJ 2219) तसेच 70 हजार रुपयांचे किमती दुचाकी असा एकूण तीन लाख 25 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आली आहे, विटा पोलीस अधिक तपास करीत आहेत.