yuva MAharashtra 'फॉग सेफ्टी डिवाइस' मार्फत रेल्वेच्या भौगोलिक आव्हानांना टक्कर !

'फॉग सेफ्टी डिवाइस' मार्फत रेल्वेच्या भौगोलिक आव्हानांना टक्कर !


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ३१ जुलै २०२४
आपण कार चालवीत असताना हिवाळ्यात किंवा पावसाळ्यात समोरच्या काचेवर वाफ जमा होण्याचा अनुभव आपल्यासाठी नवा नाही. आणि जमा झालेली ही वाफ घालवण्यासाठी कारमध्ये एसी चा वापर करण्यात येतो. परंतु ज्या गाड्यांमध्ये एसीची सोय नसते अशा वेळेला वाहन चालकांना समोरच्या काचेवरील वाफ साफ करीत गाडी चालवण्याचे कौशल्यही आपण अनुभवतो. आता हा त्रास केवळ कारचालकांनाच होतो असे नव्हे तर रेल्वे चालकांनाही होत असतो.

रेल्वेचा प्रवास २४ तास सुरु असतो. त्यामुळे रेल्वे कर्मचाऱ्यांना डोळ्यात तेल घालून काम करावे लागते. अशा स्थितीत एक चांगली बातमी असून सुरक्षित रेल्वे संचालनासाठी दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेने धुके सुरक्षित करणारी ९३३ (फॉग सेफ्टी डिवाईस)उपकरणे बसविली आहेत. हे उपकरण धुके, पाऊस किंवा सूर्यप्रकाशापासून (Fog Safety Device) संरक्षण करते.

दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वे भौगोलिकदृष्ट्या विविध भागात पसरलेली आहे. घनदाट जंगले आणि डोंगराळ भागातून रेल्वे जाते. हिवाळ्यात दाट धुके तयार होतात. धुके टाळण्यासाठी आणि लोको पायलटला सक्षम करण्यासाठी ही उपकरणे खास तयार केली गेली आहेत. फॉग सेफ्टी डिव्हाईस ही जीपीएस आधारित नेव्हिगेशन प्रणाली आहे. 


काय आहेत फायदे ?

 लोको पायलटला मार्गदर्शन आणि अचूक नेव्हिगेशन प्रदान करते.

 या डिव्हाईसमुळे सिग्नल, लेव्हल क्रासिंग गेट अचूक पास करता येते.

 न्युट्रल सेक्शन आदींची माहिती वेळेवर उपलब्ध होते.

 भौगोलिक क्रमानुसार पुढे येणाऱ्या तीन स्थळांची सुमारे ५०० मीटर अंतरापर्यंत माहिती मिळते.

हे उपकरण पोर्टेबल आकाराने कॉम्पॅक्ट आहे. फॉग सेफ्टी डिव्हाईस हे बॅटरीवर चालणारे यंत्र आहे. यंत्र ट्रेनच्या इंजिनमध्ये ठेवले जाते.

१८ तासांसाठी इन-बिल्ट रिचार्जेबल बॅटरी बॅकअपही येते .

क्रॉसिंग सिग्नल आणि रेल्वे स्थानकांची माहिती आधीच नोंदवली जाते. हे उपकरण लोको पायलटला सिग्नल, लेव्हल क्रॉसिंग गेट्स (मानवयुक्त आणि मानवरहित), तटस्थ विभाग इत्यादींबद्दल माहिती आधीपासूनच फिडींग असते. या उपकरणात अँटेना असतो, जो इंजिनच्या वरच्या भागावर स्थिर असतो. तो सिग्नल प्राप्त करतो. याव्यतिरिक्त, यात मेमरी चीप आहे ज्यामध्ये रेल्वे मार्गाची संपूर्ण माहिती दिली जाते.